गोंदीया – राज्यात शिवसेना आणि काँग्रेससोबत येऊन राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडीची स्थापना केली. सत्तेत आल्यानंतर तिन्ही पक्षांवर भाजप सडकून टीका करत असते.आतापर्यंत भाजप नेत्यांनी राष्ट्रवादींच्या नेत्यावर आरोप -प्रत्यारोप केले आहेत. पण या सर्व गोष्टींना अपवाद ठरला तो गोंदिया येथे राष्ट्रवादीचा झालेला कार्यक्रम. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिग्गज नेते आणि राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या गोंदिया शिक्षण संस्थेत सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला भाजपच्या मुख्यमंत्र्यानेच हजेरी लावल्यामुळे राजकीय वर्तुळात उलट -सुलट चर्चेला उधाण आले आहे.
‘राष्ट्रवादीने सुरा खुपसला’ हा नाना पटोलेंचा आरोप चुकीचा – जयंत पाटील
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यांच्या हजेरीमुळे राज्यभर फक्त याच कार्यक्रमाची चर्चा रंगली आहे. कार्यक्रमाच्या निमित्याने भविष्यातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाच्या युती करणार अशा चर्चेला उधाण आले आहे. पण स्वत: शिवराजसिंह चव्हाण यांनी या चर्चां फेटाळल्या आहेत.
राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील वाद दिल्लीत जाणार! राष्ट्रवादी-भाजप संबंध उघडे पाडण्याचा पटोलेंचा इशारा
गोंदियाच्या गुणांमुळे मी या ठिकाणी नेहमी येत असतो. गोंदिया शिक्षण संस्थेने माझा जो सत्कार ठेवला, हा प्रेमाचा असून राजकारणाशी याचा काहीच संबंध नसल्याचे चव्हाण म्हणाले. गोंदिया शिक्षण संस्थेचा मध्यप्रदेशात विस्तार करण्यास मदत करणार असे आश्वासनही त्यांनी दिले. तसेच यावेळी त्यांनी कोणतेही राजकीय भाष्य केले नाही. मात्र राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या संस्थेत भाजपाच्या मुख्यमंत्री आल्याने भविष्यात भाजपा- राष्ट्रवादी काँग्रेसची युतीच्या चर्चेला उधाण आले आहे.
Read also: