पुणे : आजपर्यंत ज्यांच्या आशिर्वादाने, मोदींचा आर्शिवाद घेऊन शिवसेना 2014 आणि 2019 मध्ये निवडून आली. पंरतु आज खुर्चीच्या हव्यासापोटील शिवसेना त्यांच्याविरोधात उभी आहे हे सगळ्या देशाने पाहिल आहे. इतकी वर्ष त्यांच्या घरातील चुल ज्यामुळे पेटली. आज तेच हिंदुत्वावाद्यांबद्दल बोलत आहेत. असा घणाघात नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केला. त्यावर आता राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधला आहे.
हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज विरोधकांना करारा जवाब देणार का?
कुणीही उठसुट मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीचा अपमान करतो. हे कितपत योग्य आहे? आणि कोण आहेत या नवनीत राणा ? त्या आधी बारमध्ये काम करत होत्या. त्यांच्याबद्दल सर्वांना माहित आहे. खोटं जात प्रमाणपत्र दाखवून त्या खोट्या खासदार झाल्यात. त्यांना एवढं महत्व द्यायची गरज नाही. माध्यमांमध्ये चर्चेत राहण्यासाठी हे दाम्पत्य असा प्रकार करतंय. अशी टिका विद्या चव्हाण यांनी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यावर केली आहे.
“विश्वातघात तर नाना पटोलेंनी केला”; नाना पटोलेंच्या आरोपांवर राष्ट्रवादीकडून खंडन
त्यावर आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी देखील विद्या चव्हाण यांच्यावर निशाणा साधला आहे. डोक्यावर पडलेल्या ताई म्हणताहेत खासदार नवनीत राणा पुर्वी बारमध्ये काम करायच्या. सांभाळून बोला. सोनिया गांधीचा गैरसमज झाला तर सत्तेचे वांदे होतील हो. महिलांना बदनाम करण्यात या माहीर. नवनीतर असतील तुमच्या विरोधक पण इतकं खालच्या पातळीवर ते ही खोटं बोलताना लाज कशी नाही वाटतं असंही त्या म्हणाल्या आहेत.
केतकीबाईला लवकरच जंगी चोपाची गरज; रूपाली पाटलांचा केतकीला इशारा
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज बीकेसीमध्ये राजकीय सभा होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर नवनीत राणा या दिल्लीत महाआरती करणार आहेत. त्याआधी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच आज मुख्यमंत्र्यांच्या सभेकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
Read also:
- “आजची सभा हि शंभर सभेंचा बाप, विरोधकांच्या पोटदुखीवर आजच्या सभेत उपचार होतील”
- कार्यकर्ता हा वेडा असतो, तुम्ही आमच्या बापावर लिहाल तर..; जितेंद्र आव्हाडांचा कडक इशारा
- “अंगावर भगवी वस्त्रे अन् हातात हनुमानाची मुर्ती घेतली म्हणजे तु हिंदूची नेता नाही”
- “हिंमत असेल तर अकबरुद्दीन ओवैसींचे दात तोडून दाखवा”; नवनीत राणांचे ठाकरे सरकारला पुन्हा आव्हान
- टोमणे सभेत मुख्यमंत्री, राष्ट्रवादी अन् काॅंग्रेसची बंधनं झुगारून बाळासाहेबांचं स्वप्न पुर्ण करणार का?