पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल मुंबईत जोरदार सभा झाली. त्या सभेत मुख्यमंत्र्यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर प्रंचड प्रमाणात टिका केली. त्याचबरोबर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. याचाच धागा पकडत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी यावर भाष्य केलं आहे.
“नवनीत राणा या आधी बारमध्ये काम करत होत्या”
शिवसेना पक्षप्रमुख तसेच मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांची आजची सभा , प्रबोधनकारांच्या शब्दात “भिक्षुकशाहीच्या बंडावर” “कोदंडाचा जोरदार टणत्कार “होता . भगव्या टोप्या घालून बुस्टर डोस पाजु पाहणाऱ्या काळ्या टोपी वाल्या मेंदुना यामुळे नक्कीच झिणझिण्या आल्या असतील. असं म्हणत त्यांनी राज ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
“आजची सभा हि शंभर सभेंचा बाप, विरोधकांच्या पोटदुखीवर आजच्या सभेत उपचार होतील”
मुंबई तोडण्याचा जो कोणी प्रयत्न करेल तो मर्द मराठा लचके तोडल्याशिवाय राहणार नाही. मुंबई ते अहमदाबाद जी बुलेट ट्रेन आणली जात आहे. त्याचा उपयोग काय ? असा सवाल करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. आरएसएसचं स्वांतत्र्य लढ्यात कुठेही दिसली नाही. त्याचबरोबर महाराष्ट्रासाठी जो लढा सुरू होता. त्या संयुक्त महाराष्ट्र लढ्यात देखील तुम्ही कुठे होता. ? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.
“हिंदुत्व आमचा श्वास अन् मराठी आमचा प्राण” मुख्यमंत्र्यांचं मुंबईत जोरदार भाषण
दरम्यान, ते पुढे बोलताना म्हणाले की, महाराष्ट्राच्या संयुक्त लढ्यात यांचे बाप म्हणजे जनसंघ फुटला होता. त्यामुळे मुंबईचे जे काही लचके तोडण्याचं काम भाजपकडून केलं जात आहे. त्यामुळे तुम्ही वेळीच सावध रहा. असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. हिंदुत्व आमचा श्वास आहे, आणि मराठी आमचा प्राण आहे. आमचे जुने फोटो तुमच्यासोबतचे व्हायरल होत आहेत. ते हिंदुत्व आम्ही आता सोडलं आहे. कारण त्याचा आता काही उपयोग नाही. गाढवासमोर वाचली गिता , कालचा गोंधळ बरा होता. असंही म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आमच्यासोबत जी गाढवं होती, अगदी घोड्याच्या आवेशात. त्या गाढवाला लाथ मारून आम्ही बाहेर पडलो आहोत.
शिवसेना पक्षप्रमुख तसेच मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांची आजची सभा , प्रबोधनकारांच्या शब्दात “भिक्षुकशाहीच्या बंडावर” “कोदंडाचा जोरदार टणत्कार “होता . भगव्या टोप्या घालून बुस्टर डोस पाजु पाहणाऱ्या काळ्या टोपी वाल्या मेंदुना यामुळे नक्कीच झिणझिण्या आल्या असतील.#जयमहाराष्ट्र
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) May 14, 2022
Read also:
- “रश्मी ठाकरे तुंरुगात जाणार”; नवनीत राणांचं सुचक वक्तव्य, राजकीय वर्तुळात चर्चा
- सोशल मीडियावर भावना व्यक्त करणं गुन्हा आहे का? केतकी चितळेचा न्यायालयाला सवाल
- “तो स्वासचं फोटो आल्यानंतर दिल्लीतून पत्र आलं”; उद्धव ठाकरेंनी काढला सोमय्यांचा चिमटा
- अखेर केतकी चितळेला पोलिसांनी घेतलं ताब्यात; जितेंद्र आव्हाडांनी मानले पोलिसांचे आभार
- त्यांच्यासोबत मतभेद जरूर आहेत, मात्र अशा घाणेरड्या पातळीवर येणं साफ चुक, यांचा छडा लावा; राज ठाकरे