ठाणे : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिखाण केल्यामुळे मराठी अभिनेत्री केतकी चितळेला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यादरम्यान, तिची पोलीस चौकशी होणार असून त्या तपासात नेमकी कोणती माहिती समोर येते, ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे. तसेच केतकी चितळेला काल न्यायालयात देखील हजर करण्यात आलं होतं. त्यावेळी तिने न्यायालयात आपली बाजू मांडली.
कार्यकर्ता हा वेडा असतो, तुम्ही आमच्या बापावर लिहाल तर..; जितेंद्र आव्हाडांचा कडक इशारा
केतकी चितळेनी न्यायालयात कोणताही वकिल घेतला नाही. तिने स्वत: याप्रकरणी युक्तिवाद केला. मी कोणतीही राजकीय व्यक्ती नाही. मला समाज माध्यमांवर माझे वैयक्तिक मत मांडण्याचा अधिकार नाही का? असा सवाल देखील केतकीने उपस्थित केला. तसेच ती पोस्ट माझी नाही. ती मी फक्त सोशल मीडियावरून कॉपी पेस्ट केली होती. सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करणं गन्हा आहे का? असाही सवाल तिने केला.
केतकी चितळेची बाजू ऐकूण घेतल्यानंतर तिला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. त्यामुळे केतकीला काही दिवस पोलीस ठाण्यातच राहवं लागणार आहे. त्याचबरोबर तिने न्यायालयात असंही सांगितलं की, सोशल मीडियावर व्यक्त होण्याचा माझा अधिकार असून ती पोस्ट मी डिलीट करणार नाही. त्यामुळे पोलीस तिच्यावर याबद्दल काय कारवाई करणार त्याकडे लक्ष लागून राहिलं आहे.
“संयम बाळगतो म्हणून आम्ही नामर्दांची औलाद नाही, हे लक्षात ठेवा”; मुख्यमंत्र्यांचा भाजपला इशारा
दरम्यान, केतकी चितळेवर राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात ठिकठिकाणी गुन्हे दाखल केले आहेत. आज मुंबईतील पवई पोलीस ठाण्यात आणि अमरावतीतल्या गाडगे नगर पोलीस ठाण्यात आणि नाशिक सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी कळवा, पुणे, पिंपरी चिंचवड, धुळे, सिंधुदुर्ग, अकोला, मुंबईतील गोरेगाव पोलीस ठाण्यातही चितळेविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
Read also:
- “तो स्वासचं फोटो आल्यानंतर दिल्लीतून पत्र आलं”; उद्धव ठाकरेंनी काढला सोमय्यांचा चिमटा
- अखेर केतकी चितळेला पोलिसांनी घेतलं ताब्यात; जितेंद्र आव्हाडांनी मानले पोलिसांचे आभार
- त्यांच्यासोबत मतभेद जरूर आहेत, मात्र अशा घाणेरड्या पातळीवर येणं साफ चुक, यांचा छडा लावा; राज ठाकरे
- “नवनीत राणा या आधी बारमध्ये काम करत होत्या”
- “आजची सभा हि शंभर सभेंचा बाप, विरोधकांच्या पोटदुखीवर आजच्या सभेत उपचार होतील”