मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील सभा अचानक रद्द करावी लागण्याने राज ठाकरे लगेचच मुंबईकडे रवाना झालेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आलं आहे. राज ठाकरे यांची सभा डेक्कन जवळील नदीपात्रात घेण्याचे नियोजन होते. मात्र पावसाचं कारण सांगून मनसेने सभा रद्द केली आहे. त्यावरून शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
“महाराष्ट्रातही ओबीसी आरक्षणासहीत निवडणुका होणार”, भुजबळांनी व्यक्त केला विश्वास
अलिकडेच दिपाली सय्यद यांनी राज ठाकरे यांच्यावर टिका करताना एक व्हिडीओ जारी केला होता. त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की, पावसाचं कारण सांगून मैदान सोडले…भोंग्याचे कारण सांगून देशपांडे पळाले. आयोध्येचे कंत्राट अर्धेच मिळाले. महाराष्ट्राला मुन्नाभाईच्या नावाने मामू मिळाले. असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच सभा करायच्याच असतील तर अयोध्यामध्ये करून दाखवा. पुण्यामध्ये तर शिवसेनेचे नगरसेवक पण सभा घेतात. तेही जास्त गर्दी करून, असा खोचक टोला देखील त्यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे.
राऊत- सोमय्या वाद चिघळला; किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा यांची याचिका कोर्टात दाखल..
अवससरवादी ताई, तुम्हाला धड तुमचं नाव माहिती नाही. प्रत्येक वेळी राजकारणासाठी नाव बदलणाऱ्या तुम्ही. 2014 साली अहमदनगरमधून निवडणुक लढवली, तर नाव दिपाली सय्यद, 2019 मध्ये सोफिया जहांगीर सय्यद, आणि आता शिवसेनेत आणि शिवसंग्राममध्ये असताना प्रचारासाठी नाव दिपाली भोसले सय्यद, वारंवार राजकारणासाठी स्वत: च नाव बदलणाऱ्या तुम्ही. तुम्हाला अवसरवादी नेत्या म्हणावं लागेल. अशी खोचक टिप्पणी मनसे नेते अखिल चित्रे यांनी केली आहे.
OBC आरक्षणाला झारीतल्या शुक्राचार्यांचा विरोध; बावनकुळेंचा शरद पवारांवर निशाणा
दरम्यान, राज ठाकरे यांचा जुनमध्ये अयोध्या दौरा आहे. मात्र अयोध्यामधील स्थानिक भाजपचे खासदार बृजभुषण सिंह यांनी राज ठाकरे यांना आव्हान दिलं आहे. जोपर्यंत राज ठाकरे उत्तर भारतीयांची माफी मागत नाही. तोपर्यंत राज ठाकरे यांना अयोध्यामध्ये पाय ठेऊ देणार नाही. अशी भूमिका बृजभुषण यांनी घेतली आहे. त्यामुळे येत्या 5 जून रोजी राज्यात एव्हाना देशात काय राजकीय घडामोडी घडणार त्याकडे लक्ष लागून आहे.
Read also:
- राज ठाकरेंची पुण्यातील सभा रद्द; राज ठाकरे लगेचच मुंबईकडे रवाना
- गळ्याला कोरडं पडलं अन् सोलापुरचा पाणी बारामतीला; पालकमंत्र्यांच्या फोटोला कुंकवाचा अभिषेक घालत आपचा जाहीर निषेध
- “महिलांवर हात उगाराल तर हात तोडून हातात देऊ”; सुप्रिया सुळे संतापल्या
- “OBC आरक्षणासाठी केंद्राचा कोणताही संबंध नाही, फक्त प्रस्थापितांच्या आघाडीला देण्याची इच्छा नाही”
- ताईंनी लेन्स बदलून आघाडीत आल्या तर बंर होईल; धनंजय मुंडेंची पंकजा मुंडेंना खुली ऑफर