नवी दिल्ली : काॅंग्रेसमध्ये सध्या मोठी राजकीय घडामोड घडून आली आहे. काॅंग्रेस पंजाबचे माजी प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. त्यांना सर्वोच्च न्यायालयाने 34 वर्ष जुन्या प्रकरणी एका वर्षाची सक्षम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे काॅंग्रेसला सध्या धक्क्यावर धक्के बसत असताना अजून एक मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
पाटियाला येथे कारने जात असताना नवज्योत सिंग सिद्धू जात असताना गुरनाम सिंग या नागरिकांला त्यांनी कारने धडक दिली होती. रागाच्या भरात त्या नागरिकांसोबत धक्काबुक्की देखील झाली होती. त्यानंतर गुरनाम सिंगला जबरदस्त मार लागल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. या सर्व घटनेनंतर नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर मित्र रुपिंदर सिंग यांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला.
“पावसाचं कारण सांगून मैदान सोडले, भोंग्याचे कारण सांगून देशपांडे पळाले”
या प्रकरणाट 1999 मध्ये ट्रायल कोर्टाने सिद्धूची निर्दोष मुक्ता केली होती. परंतु पंजाब, हरियाणा उच्च न्यायालयाने 2006 मध्ये सिद्धूला तीन वर्षाचा तुरूंगावासाची शिक्षा सुनावली होती. सिद्धू तेव्हा अमृतसरमधून भाजपचे खासदार होते. शिक्षानंतर त्यांनी राजीनामा दिला होता. यानंतर सिद्धूने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
राज ठाकरेंची पुण्यातील सभा रद्द; राज ठाकरे लगेचच मुंबईकडे रवाना
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासुन काॅंग्रेसमध्ये वेगाने राजकीय घडामोडी घ़डताना दिसत आहे. गुजरातमध्ये हार्दिक पटेलने काॅंग्रेसला सोडचिठ्टी देत राजीनामा दिला. तसेच आता सिद्धूला सुनावण्यात आलेली शिक्षा यामध्ये काॅंग्रेसमध्ये सध्या चिलबिचल सुरू आहे.
Read also:
- “तर आम्ही सर्व फडणवीसांसोबत आहोत”
- “रोहित पवारांनी महाराष्ट्राला सुसंस्कृतपणा शिकवु नये”; गोपीचंद पडळकरांचा रोहित पवारांना सल्ला
- “प्रयत्न करणे आपल्या हातात आहे”; OBC आरक्षणाबाबत अजित पवारांंनी दिली मोठी माहिती
- “एका रात्रीत हिंदुत्ववादी झाले अन् अयोध्येला निघाले, बृजभूषण लढवय्या माणूस”; संजय राऊत
- “पुरून उरेन तुम्हाला ‘चित्रा वाघ’ म्हणतात मला”; चित्रा वाघ यांचा राष्ट्रवादीला अप्रत्यक्ष टोला