पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे अलिकडेच पुणे दौऱ्यावर आले होते. राजकीय सभेसाठी राज ठाकरे दोन ते चार दिवसांच्या मुक्कामसाठी पुण्यात आले होते. मात्र अचानक ते मुंबईकडे रवाना झालेत. राज ठाकरे यांची भेट मनसे नेते वंसत मोरे घेणार होते. मात्र त्यांची वंसत मोरे यांची भेट न घेताच राज ठाकरे मुंबईला निघून गेलेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगल्या होत्या. त्यावर आता वंसत मोरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“प्रयत्न करणे आपल्या हातात आहे”; OBC आरक्षणाबाबत अजित पवारांंनी दिली मोठी माहिती
अयोध्या दौऱ्यावर अगोदर राज ठाकरे यांची पुण्यात सभा होत आहे. त्यासाठी ते पुण्यात आले होते. मात्र लगेचच मुंबईला निघून गेलेत. याबाबत वसंत मोरे म्हणाले की, राज ठाकरे मला बुधवारी भेटणार होते. परंतु अचानक पायाचा त्रास व्हायला लागला. मग ते घाईघाईत मुंबईला रवाना झाले. परंतु पुढच्या वेळी मला ते नक्की भेटतील. माझ्या समस्या मी त्यांच्या कानावर टाकेन, मला विश्वास आहे , माझी नाराजी नक्की दुर होईल, अस ते म्हणाले.
“एका रात्रीत हिंदुत्ववादी झाले अन् अयोध्येला निघाले, बृजभूषण लढवय्या माणूस”; संजय राऊत
राज ठाकरे यांची येत्या 22 मे रोजी पुण्यात सभा पार पडणार आहे. या सभेचं जंगी नियोजन मी माझ्या पद्धतीने करणार आहे. पक्षातील लोकांचीही मला साथ असेन, राज ठाकरे यांच्या सभेचं नियोजन भव्य दिव्य कऱण्याचा मी प्रयत्न करेन, असंही ते म्हणाले. दरम्यान, राज ठाकरे यांची नदीपात्रात सभा घेण्याचे नियोजन होते. मात्र ते अचानकर मनसेकडून रद्द करण्यात आले. त्यानंतर आता गणेश कला क्रिडा मंडळात सभा घेण्याचे मनसेने ठरविले आहे.
“पुरून उरेन तुम्हाला ‘चित्रा वाघ’ म्हणतात मला”; चित्रा वाघ यांचा राष्ट्रवादीला अप्रत्यक्ष टोला
दरम्यान, राज ठाकरे यांचा येत्या 5 जून रोजी अयोध्या दौरा नियोजित आहे. मात्र उत्तर प्रदेशचे भाजपचे खासदार बृजभुषण सिंह यांनी राज ठाकरे यांनी आव्हान दिले आहे. जो पर्यंत राज ठाकरे उत्तर भारतीयांची माफी मागत नाही. तोपर्यंत राज ठाकरे यांना उत्तर प्रदेशच्या भूमीवर पाय ठेऊ देणार नाही. अशी भुमिका त्यांनी घेतली आहे.
Read also:
- काॅंग्रेसकडून प्रकाश आंबेडकरांना राज्यसभेची उमेदवारी; वंचितने दिला चर्चेंला पुर्णविराम
- मनसे नेते संतोष धुरी आणि संदीप देशपांडे यांना जामीन मंजूर; न्यायालयाने घातल्या ‘या’ अटी
- नवज्योत सिंग सिद्धूला एक वर्षाचा कारवास; ‘या’ प्रकरणी सर्वोच्च न्यायालायने सुनावली शिक्षा
- “तर आम्ही सर्व फडणवीसांसोबत आहोत”
- “रोहित पवारांनी महाराष्ट्राला सुसंस्कृतपणा शिकवु नये”; गोपीचंद पडळकरांचा रोहित पवारांना सल्ला