मुंबई – काही दिवसांपूर्वी राज्यसभा खासदार म्हणून कार्यकाळ संपल्यानंतर संभाजीराजे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत आगामी राजकीय वाटचालीबाबत घोषणा केली. मी कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नसून राज्यसभेच्या सहाव्या जागेवर अपक्ष लढणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच सर्वच राजकीय पक्षांनी मला या जागेसाठी पाठिंबा द्यावा, असे आवाहनही केले होते.
‘…आणि म्हणूनच धर्मवीर चित्रपटाचा शेवट उद्धव ठाकरेंनी पाहिला नाही’; नितेश राणेंची खोचक टीका
मात्र राज्यसभेच्या सहाव्या जागेवर लढणार असल्याची घोषणा शिवसेनेनं केली आहे. त्यामुळे संभाजीराजेंचा राज्यसभेचा मार्ग खडतर झाला आहे. अशातच आपला राज्यसभेचा मार्ग सुकर करण्यासाठी संभाजीराजेंनी शिवसेनेत जाण्यासाठी हालचाली सुरू केल्याची माहिती पुढे आली आहे.
ज्या ठिकाणी पाऊस होणार नाही, तिथे निवडणुका घ्या; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
शिवसेनेने राज्यसभेची जागा लढवणार असल्याची आज घोषणा केली. त्यामुळे संभाजीराजेंचा राज्यसभेचा मार्ग खडतर झाला आहे. तर दुसरीकडे संभाजीराजेंनी शिवसेनेत प्रवेश केल्यास त्यांना शिवसेनेच्या दुसऱ्या जागेसाठी उमेदवारी देण्यात येईल, अशी ऑफर आली आहे. त्यामुळे आपल्या विजयाचा मार्ग सुकर करण्यासाठी संभाजीराजे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती पुढे आली आहे. यासाठी त्यांनी हालचाली सुरू केल्याची माहितीही सूत्रांकडून मिळाली आहे.
“महागाईमुळे सध्या आमच्या घरात लिंबू सरबत बनतच नाही”; सुप्रिया सुळे
तर दुसरीकडे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनीही याबाबतचे स्पष्ट संकेत दिले आहेत. राज्यसभेच्या उमेदवारीसाठी शिवसेना अपक्षाला पाठिंबा देणार नाही; मात्र संभाजीराजे शिवसेनेत आल्यास दुसर्या जागेसाठी त्यांना शिवसेनेची उमेदवारी मिळेल, अशी माहिती विनायक राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली. तसेच शरद पवार यांनी संभाजीराजेंना पाठिंबा दिलेला नाही तर ही सहावी जागा शिवसेनेचीच असल्याचा दावा राऊत यांनी केला. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख जो उमेदवार देतील तो खासदार होईल. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीने कोणत्याही परिस्थितीत संभाजीराजेंना एकतर्फी पाठिंबा दिला नसल्याचेही विनायक राऊत यांनी सांगितले.
Read also:
- “न्यायालयाचा निकाल चार दिवसात कसा बदलला?”; नाना पटोलेंचा सुप्रीम कोर्टच्या निकालावर सवाल
- “महिलांवर हात उगाराल तर हात तोडून हातात देऊ”; सुप्रिया सुळे संतापल्या
- OBC आरक्षणाच्या अपयशाची जबाबदारी स्वीकारून उद्धव ठाकरेंनी पदाचा राजीनामा द्यावा; चंद्रकांत पाटील
- “OBC आरक्षणासाठी केंद्राचा कोणताही संबंध नाही, फक्त प्रस्थापितांच्या आघाडीला देण्याची इच्छा नाही”
- ताईंनी लेन्स बदलून आघाडीत आल्या तर बंर होईल; धनंजय मुंडेंची पंकजा मुंडेंना खुली ऑफर