मुंबई : मनसेचा बहुचर्चित असलेला अयोध्या दौरा तात्पुरता स्थगित करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करत अयोध्या दौरा स्थगित करण्यात येत असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे येत्या ५ जुन रोजी होणारा अयोध्य दौरा आता कधी होणार त्याकडे सगळ्याचं लक्ष लागून आहे. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून मनसेला डिवचण्याचा प्रयत्न केला जात आहे.
मनसे नेते संतोष धुरी आणि संदीप देशपांडे यांना जामीन मंजूर; न्यायालयाने घातल्या ‘या’ अटी
राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची चर्चा सध्या महाराष्ट्रात एव्हाना देशात मोठ्या प्रमाणात होती. मात्र अचानक दौरा स्थगित केल्याने त्यांच्यावर टिका केली जात आहे. रामचंद्र कह गये सीता मैंया से ऎसा कलयुग आयेगा. ठाकरे सरनेम होनेपर भी वो ब्रिजभूषण से डर जायेगा, असं म्हणत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे युवक कार्याध्यक्ष आणि प्रदेश प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी राज ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
नवज्योत सिंग सिद्धूला एक वर्षाचा कारवास; ‘या’ प्रकरणी सर्वोच्च न्यायालायने सुनावली शिक्षा
आम्ही अयोध्या, वाराणसी, काशी इथे नेहमीच जात असतो. कोणाला या ठिकाणी दौऱ्यावर वगैरे जायचं असेल आणि त्याला काही अडचणी असतील तर आम्ही मदत करतो. इतर कुणी जात नसेल तर आदित्य ठाकरे येत्या पंधरा जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत आणि त्यांच्यासोबत ज्यांना यायची इच्छा असेल तर त्यांनी नक्की यावं. असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
“तर आम्ही सर्व फडणवीसांसोबत आहोत”
दरम्यान, उत्तर प्रदेश भाजपचे खासदार बृजभुषण सिंह यांनी राज ठाकरे यांना आव्हान दिलं होतं. जोपर्यंत उत्तर भारतीयांची माफी मागत नाही. तोपर्यंत राज ठाकरे यांना अयोध्यामध्ये पाय ठेऊ देणार नाही, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यानंतर राज्यात एव्हाना देशात एकच खळबळ उडाली होती. अशातच आता राज ठाकरे यांनी अचानकपणे अयोध्या दौऱ्याला स्थगिती दिल्याने राज्यात एकच चर्चा रंगली आहे.
Read also:
- “महिला पोलिसाला धक्का लागला असेल तर राजकारण सोडून देईन”; संदीप देशपांडेंचं खुलं आव्हान
- राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित; ‘या’ कारणांमुळे मनसेने दौरा पुढे ढकलला
- “आमचा गुडलक म्हणून तुम्ही सत्तेत”; नाना पटोलेंचा आदित्य ठाकरेंना टोला
- राज ठाकरे भेट न घेताच मुंबईला का गेले? वसंत मोरेंनी सांगितले कारण
- काॅंग्रेसकडून प्रकाश आंबेडकरांना राज्यसभेची उमेदवारी; वंचितने दिला चर्चेंला पुर्णविराम