मुंबई : मनसेचा बहुचर्चित असलेला अयोध्या दौरा तात्पुरता स्थगित करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करत अयोध्या दौरा स्थगित करण्यात येत असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे येत्या ५ जुन रोजी होणारा अयोध्य दौरा आता कधी होणार त्याकडे सगळ्याचं लक्ष लागून आहे. तसेच पुण्यात होणारी सभा देखील अचानकर रद्द केल्याने एकच चर्चा रंगली होती.
“तर आम्ही सर्व फडणवीसांसोबत आहोत”
पुण्यातील सभेसाठी राज ठाकरे अलिकडेच चार ते पाच दिवसांच्या मुक्कामांसाठी पुण्यात आले होते. मात्र अचानक ते मुंबईला निघून गेलेत. त्यावेळी त्यांनी पावसाचं कारण सांगून सभा रद्द करत असल्याची माहिती दिली होती. मात्र राज ठाकरे यांना गेल्या दीड वर्षापुर्वी पायाला दुखापत झाली होती. तेव्हापासून राज ठाकरे यांना हा त्रास जाणवत आहे. या दुखापतीसंदर्भात त्यांनी उपचारही घेतला होता. पंरतु आता या दुखण्याने पुन्हा डोके वर काढले आहे.
“रोहित पवारांनी महाराष्ट्राला सुसंस्कृतपणा शिकवु नये”; गोपीचंद पडळकरांचा रोहित पवारांना सल्ला
उत्तर प्रदेश भाजपचे खासदार बृजभुषण सिंह यांनी राज ठाकरे यांना आव्हान दिलं होतं. जोपर्यंत उत्तर भारतीयांची माफी मागत नाही. तोपर्यंत राज ठाकरे यांना अयोध्यामध्ये पाय ठेऊ देणार नाही, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यानंतर राज्यात एव्हाना देशात एकच खळबळ उडाली होती. अशातच आता राज ठाकरे यांनी अचानकपणे अयोध्या दौऱ्याला स्थगिती दिल्याने राज्यात एकच चर्चा रंगली आहे.
“प्रयत्न करणे आपल्या हातात आहे”; OBC आरक्षणाबाबत अजित पवारांंनी दिली मोठी माहिती
दरम्यान, मुंबईत देखील राज ठाकरे यांना आता विरोध होत आहे. मुंबई भाजपाचे प्रवक्ते संजय ठाकूर यांनी राज ठाकरे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. फेरीवाले, टॅक्सीवाले, मजूर आणि सर्व कष्टकरी वर्गाची माफी मागावी अन्यथा त्यांच्या अयोध्या दौऱ्याला आमचा देखील कडाडून विरोध असेल. असा इशारा त्यांनी दिला आहे.
Read also:
- “आमचा गुडलक म्हणून तुम्ही सत्तेत”; नाना पटोलेंचा आदित्य ठाकरेंना टोला
- राज ठाकरे भेट न घेताच मुंबईला का गेले? वसंत मोरेंनी सांगितले कारण
- काॅंग्रेसकडून प्रकाश आंबेडकरांना राज्यसभेची उमेदवारी; वंचितने दिला चर्चेंला पुर्णविराम
- मनसे नेते संतोष धुरी आणि संदीप देशपांडे यांना जामीन मंजूर; न्यायालयाने घातल्या ‘या’ अटी
- नवज्योत सिंग सिद्धूला एक वर्षाचा कारवास; ‘या’ प्रकरणी सर्वोच्च न्यायालायने सुनावली शिक्षा