मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा बहुचर्चित अयोध्या दौरा स्थगित करण्यात आला आहे. याबाबतची माहिती खुद्द राज ठाकरे यांनीच ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे तसेच पुण्यातील सभेमध्ये आपण यावर सविस्तर बोलणार असल्याचे राज यांनी महाराष्ट्र सैनिकांना म्हटले आहे. राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा रद्द झाला. यावरून मात्र आता शिवसेनेकडून टीकास्त्र सोडले जात आहे. राज यांना अयोध्या दौऱ्यासाठी मदत लागली असती तर शिवसेनेने नक्कीच सहकार्य केले असते, अशा शब्दात संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना चिमटा काढाला
राज ठाकरेंची पुण्यातील सभा रद्द; राज ठाकरे लगेचच मुंबईकडे रवाना
यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषेदत संजय राऊतांवर टीका केली. पत्रकार परिषेदत संदीप देशपांडे याना राज ठाकरे यांच्या दौऱ्याबद्दल प्रश्न करण्यात आलं तेव्हा संदीप देशपांडे यांनी याचे उत्तर रविवारच्या सभेत खुद्द राज ठाकरे देती असे सांगत बोलणे टाळले. तर संजय राऊतांच्या मदतीच्या प्रस्तावावर त्यांनी खोचक टीका केली ते म्हणाले ज्यांनी आमचे नगरसवेक रातोरात चोरले ते आम्हाला काय मदत करणार? आमच्या कार्यकर्तायन जेल मध्ये टाकले त्यांच्याकडून आम्हला मदतची अपेक्षा नाही असे संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.
“पावसाचं कारण सांगून मैदान सोडले, भोंग्याचे कारण सांगून देशपांडे पळाले”
तसेच मशिदीवरील भोंग्यांविरोधातील आंदोलनात महिला पोलिसांना धक्का लागल्यानंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे गायब झाले होते. मात्र, या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळाल्यानंतर संदीप देशपांडे पहिल्यांदाच मीडियाच्या समोर आले आहेत. यावेळी त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. आम्ही महिला पोलिसांना धक्का दिला नाही. आमच्या धक्क्याने महिला पोलीस जमिनीवर कोसळल्या नाहीत. महिला पोलिसांना आम्ही धक्का दिल्याचं एक तरी फुटेज दाखवल्यास मी आताच राजकारण सोडून देईन, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.
आमच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या खोट्या गुन्हासाठी संपुर्ण महाराष्ट्र पोलीस आम्हाला शोधत होती. मात्र त्या व्हिडीओमधील स्पष्ट फुटेज समाज माध्यमांमुळे जनतेसमोर आले. सरकारविरोधात आमच्या प्रतिक्रिया येऊ नयेत म्हणून राज्य सरकारने हा प्रकार केला. आमचा कायदा आणि न्यायलयावर विश्वास होता. त्यामुळेच आम्हाला न्याय मिळाला. असंही ते म्हणाले,.
Read also:
- “ते सोबत असले तर आम्हाला काही चिंता नाही, सुरक्षा आपोआपच मिळेल”; नांदगावकरांचा संजय राऊतांना टोला
- आदित्य ठाकरे अयोध्येला जाताहेत, कुणाची इच्छा असेल तर..; राऊतांची राज ठाकरेंवर खोचक टिप्पणी
- “ठाकरे सरनेम होनेपर भी वो ब्रिजभूषण से डर जायेगा”; राष्ट्रवादीने अयोध्या दौऱ्यावरून मनसेला डिवचलं
- “महिला पोलिसाला धक्का लागला असेल तर राजकारण सोडून देईन”; संदीप देशपांडेंचं खुलं आव्हान
- राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित; ‘या’ कारणांमुळे मनसेने दौरा पुढे ढकलला