मुंबई – मनसेचा बहुचर्चित असलेला अयोध्या दौऱ्याला तात्पुरती स्थगित देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करून आपल्या अयोध्या दौरा स्थगित करण्यात येत असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे येत्या ५ जुन रोजी होणारा अयोध्य दौरा आता कधी होणार त्याकडे सगळ्याचं लक्ष लागून आहे. तसेच रविवारच्या सभेत राज ठाकरे याबाबदल काय बोलणार याकडेही सवांचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काॅंग्रेसने राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
तर आम्ही सर्व फडणवीसांसोबत आहोत”
जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी नवीन भोंगा लावण्यासाठी विचारविनिमय सुरू आहे, असा चिमटा राष्ट्रवादीने काढला आहे. तसेच यावर सविस्तर बोलूच, असा सूचक इशाराही राष्ट्रवादीने दिला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीने राज ठाकरे यांच्या शैलीतच हे ट्विट करून मनसेला डिवचले आहे.
मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर आणि नेते वसंत मोरेंवर गुन्हा दाखल
राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर हे ट्विट केलं आहे. राज ठाकरे यांनी शेअर केलेली पोस्ट शेअर करत त्यांनी ही टीका केली आहे. तूर्तास अयोध्या दौऱ्याचा भोंगा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष हटविण्यासाठी नवीन भोंगा कोणता लावावा यावर विचारविनिमय सुरू आहे. सविस्तर बोलूच…, असं ट्विट राष्ट्रवादीने केलं आहे.
तूर्तास अयोध्या दौऱ्याचा भोंगा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष हटविण्यासाठी नवीन भोंगा कोणता लावावा यावर विचारविनिमय सुरू आहे.
सविस्तर बोलूच…@mnsadhikrut #Ayodhya #अयोध्या pic.twitter.com/2I3iI7Kge0— NCP (@NCPspeaks) May 20, 2022
नवज्योत सिंग सिद्धूला एक वर्षाचा कारवास; ‘या’ प्रकरणी सर्वोच्च न्यायालायने सुनावली शिक्षा
मनसेचे नेते राज ठाकरे यांनी त्यांचा अयोध्या दौरा रद्द केला आहे त्यामुळे मनसे बॅकफूटवर आल्याची जोरदार चर्चा आहे. राज ठाकरे यांचा दौरा रद्द झाल्याने शिवसेना नेते संजय राऊत यांनीही त्यांना डिवचले आहे. मनसेला काही मदतीची गरज होती तर त्यांनी आम्हाला सांगायचं होतं. आम्ही त्यांना मदत दिली असती, असा चिमटा राऊत यांनी काढला आहे. तर आता राष्ट्रवादीनेही मनसेला डिवचले
Read also:
- मनसेचा अयोध्या दौऱ्याला स्थगिती; राष्ट्रवादी, काॅंग्रेस अन् शिवसेनेची राज ठाकरेंवर टोलेबाजी
- राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित; ब्रीजभूषण सिंहांची पहिली प्रतिक्रिया
- “ठाकरे सरनेम होनेपर भी वो ब्रिजभूषण से डर जायेगा”; राष्ट्रवादीने अयोध्या दौऱ्यावरून मनसेला डिवचलं
- “महिला पोलिसाला धक्का लागला असेल तर राजकारण सोडून देईन”; संदीप देशपांडेंचं खुलं आव्हान
- राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित; ‘या’ कारणांमुळे मनसेने दौरा पुढे ढकलला