मुंबई : मनसेचा बहुचर्चित असलेला अयोध्या दौरा तात्पुरता स्थगित करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करत अयोध्या दौरा स्थगित करण्यात येत असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे येत्या ५ जुन रोजी होणारा अयोध्य दौरा आता कधी होणार त्याकडे सगळ्याचं लक्ष लागून आहे. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काॅंग्रेसने राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
राज ठाकरे भेट न घेताच मुंबईला का गेले? वसंत मोरेंनी सांगितले कारण
तूर्तास अयोध्या दौऱ्याचा भोंगा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष हटविण्यासाठी नवीन भोंगा कोणता लावावा यावर विचारविनिमय सुरू आहे. सविस्तर बोलूच, असं म्हणत राज ठाकरे यांना राष्ट्रवादी काॅंग्रेसने डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. अयोध्या दौऱ्याला स्थगिती दिल्यानंतर राज ठाकरे यांच्यावर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांतील नेत्यांनी टोला लगावले आहेत.
काॅंग्रेसकडून प्रकाश आंबेडकरांना राज्यसभेची उमेदवारी; वंचितने दिला चर्चेंला पुर्णविराम
आम्ही अयोध्या, वाराणसी, काशी इथे नेहमीच जात असतो. कोणाला या ठिकाणी दौऱ्यावर वगैरे जायचं असेल आणि त्याला काही अडचणी असतील तर आम्ही मदत करतो. इतर कुणी जात नसेल तर आदित्य ठाकरे येत्या पंधरा जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत आणि त्यांच्यासोबत ज्यांना यायची इच्छा असेल तर त्यांनी नक्की यावं. असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
मनसे नेते संतोष धुरी आणि संदीप देशपांडे यांना जामीन मंजूर; न्यायालयाने घातल्या ‘या’ अटी
दरम्यान, उत्तर प्रदेश भाजपचे खासदार बृजभुषण सिंह यांनी राज ठाकरे यांना आव्हान दिलं होतं. जोपर्यंत उत्तर भारतीयांची माफी मागत नाही. तोपर्यंत राज ठाकरे यांना अयोध्यामध्ये पाय ठेऊ देणार नाही, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यानंतर राज्यात एव्हाना देशात एकच खळबळ उडाली होती. अशातच आता राज ठाकरे यांनी अचानकपणे अयोध्या दौऱ्याला स्थगिती दिल्याने राज्यात एकच चर्चा रंगली आहे.
Read also:
- राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित; ब्रीजभूषण सिंहांची पहिली प्रतिक्रिया
- “ठाकरे सरनेम होनेपर भी वो ब्रिजभूषण से डर जायेगा”; राष्ट्रवादीने अयोध्या दौऱ्यावरून मनसेला डिवचलं
- “महिला पोलिसाला धक्का लागला असेल तर राजकारण सोडून देईन”; संदीप देशपांडेंचं खुलं आव्हान
- राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित; ‘या’ कारणांमुळे मनसेने दौरा पुढे ढकलला
- “आमचा गुडलक म्हणून तुम्ही सत्तेत”; नाना पटोलेंचा आदित्य ठाकरेंना टोला