पुणे – पुणे मनसे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर आणि नेते वसंत मोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजीनगर पोलिस स्टेशन येथे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान दोघांनाही पोलिस स्टेशनमध्ये हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. मनसेच्या वतीने पुणे महानगरपालिकेत केलेलं आंदोलन भोवलं असून मनसेचे पुण्यातील शहराध्यक्ष साईनाथ बाबर आणि मनसे नेते नगरसेवक वसंत मोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
“सात्विक मुख्यमंत्री आपल्याला लाभलेत”; त्यांची सर नारायण राणेंना कशी येणार? बच्चू कडू
दरम्यान मनसेच्या वतीने १७ मार्च रोजी पाण्याच्या प्रश्नावरून आंदोलन केलं होतं. पुणे महानगरपालिकेच्या आवारात कोणतेही आंदोलन करण्यास मनाई असताना त्यांनी आंदोलन केल्यामुळे तेथील सुरक्षारक्षकाने लेखी तक्रार दिली होती. त्याप्रमाणे वसंत मोरे, जिल्हाध्यक्ष साईनाथ बाबर आणि त्यांच्यासोबतच्या १०० ते १२५ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सात कलमाअंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.
परवानगी नसताना वसंत मोरे आणि साईनाथ बाबर महापालिकेच्या तिसऱ्या मजल्यावर गेले आणि त्यांनी तिथे आंदोलन सुरू केलं. त्यानंतर काही कार्यकर्ते आणि पदाधिकारी सर्व मिळून १०० ते १२५ जणांनी महापालिकेच्या गेटवर येऊन आंदोलन करत सुरक्षारक्षकांना ढकलून दिले आणि महापालिकेच्या आवारात आत प्रवेश केला होता. त्यामुळे गेटची कडीही तुटल्याचं तक्रारीत सांगितलं आहे.
Read also:
- संजय राऊत कोण आहेत? आमच्या लेखी फार महत्त्वाचा माणूस नाही – फडणवीस
- महाविकासआघाडीची नवी रणनीती; राज्यसभेसाठी देखील राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसची महायुती
- “प्रयत्न करणे आपल्या हातात आहे”; OBC आरक्षणाबाबत अजित पवारांंनी दिली मोठी माहिती
- “एका रात्रीत हिंदुत्ववादी झाले अन् अयोध्येला निघाले, बृजभूषण लढवय्या माणूस”; संजय राऊत
- “पुरून उरेन तुम्हाला ‘चित्रा वाघ’ म्हणतात मला”; चित्रा वाघ यांचा राष्ट्रवादीला अप्रत्यक्ष टोला