अकोला : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी झालेल्या वांद्रे-कुर्ला येथील सभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसेवर जोरदार हल्लाबोल केला. त्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्री पदावरून टिका केली. याचाच धागा पकडत आता प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी नारायण राणे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
‘…आणि म्हणूनच धर्मवीर चित्रपटाचा शेवट उद्धव ठाकरेंनी पाहिला नाही’; नितेश राणेंची खोचक टीका
नारायण राणेंची सर उद्धव ठाकरे करूच शकत नाही. कारण त्यांच्या आठ महिन्यांच्या कामाची तपासणी करावी लागेल. उद्धवजी हे प्रामाणिक नेतृत्व आहे. अतिशय सात्विक मुख्यमंत्री आपल्याला लाभलेत. त्यामुळे नारायण राणेंची सर मुख्यमंत्री कशी करणार ? त्यांची सर हे करूच शकणार नाही. त्यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे. असं म्हणत बच्च कडू यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना लगावला.
क्योंकी गॅस भी कभी सस्ती थी, स्मृती जी याद है ना; स्मृती इराणीविरोधात राष्ट्रवादीचा मोठा राडा
उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह सुरक्षा संदर्भात भाजपवर जोरदार प्रहार केला. त्याला प्रत्युत्तर देताना नाराय़ण राणे म्हणाले की, काही लोकांना संरक्षण देण्याबाबत ते बोलले. परंतु चूकीच्या माणसाला दिले आहे का ? 1991 पासून मला सुरक्षा देण्यात आली. उद्धव ठाकरे अजून 10 वर्ष जरी मुख्यमंत्री असलात तरी नारायण राणेंनी आठ महिन्यात केलेल्या कामाची बरोबरी होऊ शकणार नाही. असं नारायण राणेंनी म्हटलं होतं. त्यावर बच्चू कडू यांनी नारायण राणेंना टोला लगावला आहे.
“शिवसंपर्क अभियान नव्हतं तर शिव्या संपर्क भाषण होतं”
दरम्यान, नारायण राणे यांनी खरं तर सत्य ओकलं आहे. आपण जसं पाहिलं की रेड्याने ज्ञानेश्वरी ओकली, तसं नारायण राणेंनी सत्य ओकलं आहे. मी मुख्यमंत्र्यांची सर करू शकत नाही असा त्याचा अर्थ होतो. तुम्ही करूच नाही शकत. असं ही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
Read also:
- शरद पवारांच्या समंतीने राज्यात पुरस्कृत दहशतवाद; भाजपचा राष्ट्रवादीवर गंभीर आरोप
- “दुसऱ्या पक्षाचं ऐकून राज ठाकरे यांनी स्वत:ची ओरिजिनॅलिटी हरवून नये”; रोहित पवारांचा सल्ला
- ममता दीदींच्या पावलावर ठाकरे सरकारचे पाऊलं; केंद्र सरकारच्या विरूद्ध धडक कृती मोहीम
- “महागाईमुळे सध्या आमच्या घरात लिंबू सरबत बनतच नाही”; सुप्रिया सुळे
- ज्या ठिकाणी पाऊस होणार नाही, तिथे निवडणुका घ्या; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय