मुंबई – संजय राऊत हे रोजच टीका करत असतात. आम्ही त्यांना फार महत्त्व देत नाही. आमच्या लेखी संजय राऊत हा फार महत्त्वाचा माणूस नाही, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. संजय राऊत यांनी ज्ञानवापी मशीद आणि राज ठाकरे यांचा अयोध्या दौऱ्यासंदर्भात टीकेचा सूर लावला आहे. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आले असता त्यांनी संजय राऊत यांची दखल घेणेही टाळले. संजय राऊत यांच्याविषयीच्या प्रश्नांवर मी का उत्तरं देऊ? ते एवढे मोठे कोण लागून गेले आहेत, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विचारला. आता यावर संजय राऊत काय प्रतिक्रिया देणार, ते पाहावे लागेल.
शरद पवारांच्या समंतीने राज्यात पुरस्कृत दहशतवाद; भाजपचा राष्ट्रवादीवर गंभीर आरोप
देवेंद्र फडणवीस गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांना ज्ञानवापी मशिदीच्या मुद्द्यावरून सुरु असलेल्या वादासंदर्भात प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर फडणवीस यांनी म्हटले की, मला वाटतं की, आम्ही यासंदर्भात राजकीय परिणामांचा विचार करत नाही. हा विषय आस्थेचा आहे. आस्थेचे विषय हे राजकारणापलीकडे असतात. न्यायालय हे विषय सोडवत आहे, ही गोष्ट महत्त्वाची आहे. आता न्यायालय काय निर्णय देते, ते पाहावे लागेल. पण औरंगजेबाने अशाप्रकारे मंदिरं तोडली होती, ही गोष्ट खरी आहे, असे फडणवीस यांनी म्हटले.
“सात्विक मुख्यमंत्री आपल्याला लाभलेत”; त्यांची सर नारायण राणेंना कशी येणार? बच्चू कडू
दरम्यान यावेळी देवेंमद्र फडणवीस यांनी संभाजीराजेंच्या राज्यसभेतील उमेदवारीवर देखील भाष्य केले. संभाजीराजेंवर देवेंद्र फडणवीस म्हणाले, त्यांना राज्यसभेवर पाठविलं होतं. आता भाजपचं समर्थन राहील की नाही, याचा निर्णय हा राज्यस्तरावर होत नाही. असा निर्णय हा केंद्रस्तरावर होतो. केंद्राचा जोकाही निर्णय होईल तो आम्ही सांगू, असं फडणवीस यांनी सांगितलं.
Read also:
- महाविकासआघाडीची नवी रणनीती; राज्यसभेसाठी देखील राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसची महायुती
- “प्रयत्न करणे आपल्या हातात आहे”; OBC आरक्षणाबाबत अजित पवारांंनी दिली मोठी माहिती
- “एका रात्रीत हिंदुत्ववादी झाले अन् अयोध्येला निघाले, बृजभूषण लढवय्या माणूस”; संजय राऊत
- “पुरून उरेन तुम्हाला ‘चित्रा वाघ’ म्हणतात मला”; चित्रा वाघ यांचा राष्ट्रवादीला अप्रत्यक्ष टोला
- “महापालिकेच्या कुठल्याही वार्डात निवडणुक लढवून दाखवावी”; चित्रा वाघ यांना विद्या चव्हाण यांचं खुलं आव्हान