मुंबई : देशात एव्हाना राज्यात महागाईने सर्वसामान्य माणसाचं कंबरडं मोडलं आहे. त्यामुळे केंद्र सरकारविरोधात सध्या राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. महागाईविरोधात राष्ट्रवादी काॅंग्रेसने जोरदार आंदोलन सुरू केलं आहे. अशातच आज ब्रिटिश नेत्या आणि वकिल सईदा वारसी यांनी हाऊस ऑफ लॉड्स मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल वाभडे काढले आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काॅंग्रेसने एक व्हिडीओ जारी केला आहे.
“महिला पोलिसाला धक्का लागला असेल तर राजकारण सोडून देईन”; संदीप देशपांडेंचं खुलं आव्हान
ब्रिटीश नेत्या आणि वकील सईदा वारसी यांनी नुकत्याच हाऊस ऑफ लॉर्ड्स या ब्रिटीश संसदेच्या वरिष्ठ सदनात पंतप्रधान मोदी यांच्या कार्यपद्धतीवरच मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मोदी नीती हा भारताच्या विकासासाठी सही नीती नसल्याचे सूतोवाच त्यांनी आपल्या या भाषणातून केले. भारतात सध्या सुरू असलेल्या धर्मांध राजकारणाविषयी चिंता व्यक्त करताना गुजरात दंगलींचा दाखलाही त्यांनी दिला.
राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित; ‘या’ कारणांमुळे मनसेने दौरा पुढे ढकलला
गुजरातमध्ये २००२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही जे पाहिले तेच आता आम्ही पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात संपूर्ण भारतामध्ये पाहत आहोत. हे अत्यंत दुःखद आहे. मोदी म्हणजे भारत नाही आणि मोदीजी मांडत असलेली संकल्पना ही महात्मा गांधीजींची भारताची संकल्पना नाही. धार्मिक विखार आणि हिंसक विचार पेरणारी विचारसरणी म्हणजे हिंदू धर्म आणि हिंदुत्व नाही अशी टीकाही त्यांनी यावेळी केली आहे. ब्रिटीश संसदेत मांडले गेलेले भारताचे हे चित्र अत्यंत दुःखद आणि काळजी वाटावी असे आहे. धर्मांध राजकारण करून विकासाच्या मुद्यांना बगल देणाऱ्या केंद्रीय सत्ताधाऱ्यांसाठी हे झणझणीत अंजन ठरावे.असंही त्यांनी म्हटलं आहे.
“आमचा गुडलक म्हणून तुम्ही सत्तेत”; नाना पटोलेंचा आदित्य ठाकरेंना टोला
दरम्यान, अलिकडेच केंद्रीय मंत्री स्मृती इराणी पुण्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या. त्यावेळी राष्ट्रवादी काॅंग्रेसने नरेंद्र मोदींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी दिली होती. तसेच स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात देखील मोठा राडा झाला होता. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आणि भाजपचे कार्यकर्ते आमनसामने आले होते. तेव्हा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यीला भाजपच्या कार्यकर्त्यांने मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत होता. यावरून देखील भाजपवर कडाडून टिका करण्यात आली.
Read also:
- “शरद पवारांनी सोनिया गांधीकडे माझी तक्रार केल्याचं मला आनंद”; नाना पटोले
- आता वेळ आली की, पुढील 25 वर्ष..; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या कार्यकर्त्यांना सुचना
- “तूर्तास अयोध्याचा भोंगा स्थगित करून नवीन भोंगा कोणता लावावा यावर विचारविनिमय सुरू”
- राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित; ब्रीजभूषण सिंहांची पहिली प्रतिक्रिया
- “ठाकरे सरनेम होनेपर भी वो ब्रिजभूषण से डर जायेगा”; राष्ट्रवादीने अयोध्या दौऱ्यावरून मनसेला डिवचलं