मुंबई : आयएमएमचे आमदार अकबरूद्दीन ओवेसी यांनी औरंगाबाद येथील औरंगाजेबाच्या कबरीसमोर नतमस्तक झाले. त्यानंतर राज्यात एक राजकीय वादळ सुरू झालं. अकबरूद्दीन ओवेसीवर राज्यातील सगळ्याच पक्षांनी टिका केली. मात्र यामध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार खडाजंगी बघायला मिळाली. याच धागा पकडत आता शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
“तूर्तास अयोध्याचा भोंगा स्थगित करून नवीन भोंगा कोणता लावावा यावर विचारविनिमय सुरू”
देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना किती वेळा, कुणी कुणी तिथे माथे टेकले याची माहिती घ्या, धक्का बसेल. औरंगजेबाच्या कबरीला ‘राष्ट्रीय मोन्युमेंट’ दर्जा देणारे पुरातत्व खाते केंद्राचे आहे, अंतर्मुख होऊन आरोप करा. लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा किती घेणार. देशाचे तुकडे करण्याचा मानस आहे का? असा सवाल देखील देवेंद्र फडणवीस यांना अरविंद सावंत यांनी केला आहे.
राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित; ब्रीजभूषण सिंहांची पहिली प्रतिक्रिया
अकबरूद्दीन ओवेसी औरंगाबाद याठिकाणी ओरंगजेबाच्या कबरी समोर नतमस्तक होतो. त्यावर भाजपने टिका केली. मात्र आतापर्यंत भाजपच्या काळात 20 वेळा तो ओरंगजेबाच्या कबरी समोर गेला आहे. ओरंगजेबाला आम्हीच गाडलं आहे. ओंरगजेबाचा जन्म गुजरातमधील दहोद गावात झाला आहे. महाराष्ट्रवर सातत्याने आक्रमन का होताहेत. हे आता तुम्हाला समजलं असेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे भोगलं होतं. तेच आम्ही आता भोगत आहोत. असंही उद्धव ठाकरे म्हणाले होते.
“ठाकरे सरनेम होनेपर भी वो ब्रिजभूषण से डर जायेगा”; राष्ट्रवादीने अयोध्या दौऱ्यावरून मनसेला डिवचलं
दरम्यान, औरंगाजेबाच्या कबरीवरून देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर कडाडून टिका केली होती. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. अशातच औरंगाजेबची कबर उखडून टाकण्याचा इशारा मनसेकडून देण्यात आला. त्यामुळे त्याठिकाणी स्थानिक लोकांनी आणि पोलीसांनी सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना किती वेळा, कुणी कुणी तिथे माथे टेकले याची माहिती घ्या, धक्का बसेल!
औरंगजेबाच्या कबरीला ‘राष्ट्रीय मोन्युमेंट’ दर्जा देणारे पुरातत्व खाते केंद्राचे आहे,अंतर्मुख होऊन आरोप करा.
लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा किती घेणार. देशाचे तुकडे करण्याचा मानस आहे का?— Arvind Sawant (@AGSawant) May 19, 2022
Read also:
- “मनोहर पर्रिकरांचं स्वप्न राजनाथ सिंह पुर्ण करणार”; आमदार महेश लांडगेंनी दिलं संरक्षणमंत्र्यांना निवेदन
- मोदी म्हणजे भारत नाही
- “मोदींची धार्मिक विखार अन् हिंसक विचार पेरणारी विचारसरणी”; ब्रिटीश नेत्यानी मांडले आपले मत
- “शरद पवारांनी सोनिया गांधीकडे माझी तक्रार केल्याचं मला आनंद”; नाना पटोले
- आता वेळ आली की, पुढील 25 वर्ष..; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या कार्यकर्त्यांना सुचना