पुणे : कोरोना काळात अनेक वास्तु नागरिकांसाठी बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र कोरोनाचा प्रार्दुभाव कमी होताच महाराष्ट्रातील तसेच देशातील ऐतिहासिक वास्तू नागरिकांसाठी खुल्या करण्यात आल्या. पुण्यातील लाल महाल देखील पर्यटनांसाठी अजूनही बंद आहे. मात्र याच लाल महालात एका चित्रपटातील तमाशाच्या गाण्यावर रिल्सचं शुटींग करण्याचा प्रकार घडला आहे. यावरून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
“शरद पवारांनी सोनिया गांधीकडे माझी तक्रार केल्याचं मला आनंद”; नाना पटोले
लाल महालात एका तमाशाच्या गाण्यावर चित्रीकरण झाल्याचा प्रकार शुक्रवारी समोर आला. त्यावर लगेचच संभाजी ब्रिगेडनं संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. यासंदर्भात चार जणांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांनी देखील संबंधितावर कारवाई करण्याची मागणी केली. पुण्यातला शिवाजी महाराजांचा लाल महाल ही वास्तू नाच गाण्यांचे चित्रीकरण करण्याची जागा नव्हे. यापुढे हे होता कामा नये. कोणी केले असेल तर वापरू नका, असं त्यांनी म्हटलं आहे.
आता वेळ आली की, पुढील 25 वर्ष..; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या कार्यकर्त्यांना सुचना
मानसी पाटील, कुलदीप बापट आणि केदार अवसरे यांनी मिळून हे चित्रीकरण केल्याची माहिती देखील समोर आली आहे. या गाण्याच्या व्हिडीओ क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावरून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊंच्या आठवणींचा ऐतिहासिक वारसा असणाऱ्या लाल महालामध्ये अशा गाण्याचं चित्रीकरण होणं हा लाल महालाचा अपमान असल्याची प्रतिक्रिया संभाजी ब्रिगेडकडून देण्यात आली आहे.
“तूर्तास अयोध्याचा भोंगा स्थगित करून नवीन भोंगा कोणता लावावा यावर विचारविनिमय सुरू”
दरम्यान, गेल्या काही दिवसापासून राज्यात अशा प्रकारच्या अनेक घटना घडत आहेत. त्यामुळे दोषींवर सध्या तातडीने कारवाई करण्यात येत आहे.
पुण्यातला शिवाजी महाराजांचा लाल महाल हि वास्तू नाच गाण्यांचे चित्रीकरण करण्याची जागा नव्हे …ह्यापुढे होता कामा नाही.. कोणी केले असेल तर वापरू नका @PuneCityPolice
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 21, 2022
Read also:
- “एका बाजुला मनसे आणि दुसऱ्या बाजुला माफिया सेना”; अयोध्या दौऱ्याबाबत सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया
- “फडणवीस साहेब लोकांचा गैरफायदा किती घेणार, देशाचे तुकडे करण्याचा मानस आहे का?”
- “मनोहर पर्रिकरांचं स्वप्न राजनाथ सिंह पुर्ण करणार”; आमदार महेश लांडगेंनी दिलं संरक्षणमंत्र्यांना निवेदन
- मोदी म्हणजे भारत नाही
- “मोदींची धार्मिक विखार अन् हिंसक विचार पेरणारी विचारसरणी”; ब्रिटीश नेत्यानी मांडले आपले मत