मुंबई : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते नवाब मलिक यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. कारण शुक्रवारी ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्राची विशेष न्यायालय़ाने पडताळणी केली. यामधून धक्कादाखक माहिती समोर येत आहे. न्यायालयाने केलेल्या निरिक्षणात नवाब मलिक यांनी आर्थिक गैरव्यवहारामध्ये सहभागी होत असल्याचं दिसून येत आहे. यावरून आता भाजप नेते निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसवर निशाणा साधला आहे.
दाऊद आणि नवाब मलिक दोघांचे संबंध आहेत हे संबंधित कोर्टाचं निरीक्षण. नवाब मलिक वर केलेले आरोप खरे ठरले, आतातरी बारामतीचे नेते नवाब मलिकचा राजीनामा घेणार?? की अजून पण दाऊदच्या ग्रीन सिग्नल ची वाट बघत आहेत. पवार साहेब तुमचे डायरेक्ट दाऊद सोबत संबंध नाही ना? नवाब मलिक मधला असू शकतो. राजकारणात जेव्हापासून आलो तेव्हापासून चा हा संशय आहे. कारण मुंबई बॉम्ब ब्लास्ट घटनेपासून तुम्ही एक वाढीव बॉम्ब ब्लास्ट जाहीर केला तो नेमका कोणाला वाचवण्यासाठी होता? तेव्हा मीडिया वेगळी होती, तुम्ही वाचलात. असा इशारा आता भाजप नेते निलेश राणे यांनी दिला आहे.
“मोदींची धार्मिक विखार अन् हिंसक विचार पेरणारी विचारसरणी”; ब्रिटीश नेत्यानी मांडले आपले मत
प्रथमदर्शनी असं दिसून येतंय की आरोपी हा थेट आणि सर्व माहिती असूनही मनी लॉण्ड्रिंगमध्ये सहभागी होता. त्यामुळेच तो पीएमएल अंतर्गत येणाऱ्या तिसऱ्या कलमाअंतर्गत मनी लॉण्ड्रिंगचा गुन्हा करण्यासाठी दोषी ठरतो. कलम 4 नुसार तो शिक्षेस पात्र ठरतो, अस न्यायालयाने म्हटल्याची बातमी द टाईम्स ऑफ इंडियाने दिली आहे. या प्रकरणामध्ये न्यायालयाने नवाब मलिक आणि 1993 च्या बॉम्बस्फोट प्रकरणामधील आरोपी सरदार सहावली खान यांच्याविरोधात पुढील कारवाई करण्यात परवानगी दिली आहे.
“शरद पवारांनी सोनिया गांधीकडे माझी तक्रार केल्याचं मला आनंद”; नाना पटोले
दरम्यान, हसिना पारकर, सलिम पटेल आणि सरदार खान यांच्यासोबत गुन्हेगारी कट रचून मुनीरा प्लंबर यांच्या नावे असणारी संपत्ती आरोपी नवाब मलिक यांनी डी कंपनीचे सदस्यांकडून बळकावली, असं विशेष न्यायाधीश राहुल एन रोकडे यांनी म्हटलं आहे. तसेच दाऊदची दिवंगत बहिण हसीना पारकरच्या आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने जमीन बळकावल्याने त्यांच्याविरोधात मनी लॉण्ड्रिंगविरोधी कायद्याअंतर्गत कारवाई करता येईल, असंही न्यायालायने म्हटलं आहे.
Read also:
- नवाब मलिकांचा पाय आणखी खोलात; दाऊदच्या लोकांसोबत व्यवहार केल्याचा न्यायालयाचं निरीक्षण
- जितेंद्र आव्हांडाचं एक ट्विट; अन् चार जणांवर कारवाईचा बडगा
- “एका बाजुला मनसे आणि दुसऱ्या बाजुला माफिया सेना”; अयोध्या दौऱ्याबाबत सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया
- “फडणवीस साहेब लोकांचा गैरफायदा किती घेणार, देशाचे तुकडे करण्याचा मानस आहे का?”
- “मनोहर पर्रिकरांचं स्वप्न राजनाथ सिंह पुर्ण करणार”; आमदार महेश लांडगेंनी दिलं संरक्षणमंत्र्यांना निवेदन