मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत दमदार भाषण केलं. यावेळी त्यांनी अनेक मुद्दांना हात घातलं. तसेच अयोध्या दौऱ्याबाबत माझ्याविरोधात सापळा रचल्याची धक्कादायक माहिती त्यांनी दिली. त्यामुळे राज ठाकरे यांच्या या भाषणाचा धसका अनेकांनी घेतला आहे. यावरच शिवसेनेचे नेते भास्करराव जाधव यांनी राज ठाकरे यांचं भाषण महाविकास आघाडीतील सगळ्याचं नेत्यांनी ऐकावं अशीही विनंती केली आहे.
“कोणत्याही अपक्षाला पाठिंबा देणार नाहीत, मग तो कुणीही असो”; राऊतांनी संभाजी राजेंना स्पष्ट सांगितले
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं पुण्यातील भाषण अनेकांनी गांभीर्याने घेण्याची गरज आहे. त्या भाषणात अनेक अर्थ दडलेले आहेत. राज ठाकरे यांचा रद्द झालेला अयोध्या दौरा चेष्टेचा विषय करून घेऊ नये. त्याला हवा देण्याचं काम करू नये. राज ठाकरे यांचं भाषण अतिशय प्रगल्भतेने राजकीय दृष्ट्या वैचारिक पद्धतीने घेण्याची गरज आहे. परिपक्व राजकीय म्हणून त्या भाषणांकडे बघण्याची गरज आहे. असं मत भास्करराव जाधव यांनी मांडलं आहे.
“पक्षात १२ वाजता या सांगून तुमची काय किंमत ठेवली? लाथ मारा त्या खासदारकीला”
पुण्यात अयोध्या दौरा जाहीर केल्यानंतर हा सर्व प्रकार सुरू झाला. त्यावर माझं लक्षं होतं. त्याबद्दल मला मुंबई, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमधून माहिती मिळाली. त्यावरून मला असं समजलं की हा एक प्रकारे माझ्याविरोधात एक सापळा आहे आणि त्यात आपण अडकले तर मोठं नुकसान होईल आणि याची रसद ही महाराष्ट्रातून पुरविली. असं धक्कादायक वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं. त्यामुळे अयोध्या दौरा स्थगित करावा लागला, असंही ते म्हणाले.
संभाजीनगरचं नामंतर झालं, असं बोलणारा तु कोण? राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
दरम्यान, अयोध्या दौऱ्याबाबत राज ठाकरे यांना आव्हान देणारे भाजपचे खासदार बृजभुषण सिंह यांनी देखील धक्कादायक वक्तव्य केलं आहे. गोरखपुर येथील पत्रकारांशी संवाद साधताना बृजभुषण सिंह यांनी राज ठाकरे यांच्याविरोधातला सापळा उघड केला आहे. मी सध्या भाजप पक्षाचा सहा वेळा खासदार म्हणून निवडून आलो आहे. तसेच एक वेळा माझी पत्नी देखील निवडून आली आहे. आम्ही या भागाचं सात वेळा प्रतिनिधित्व केलं आहे. त्यामुळे आमच्या आंदोलनाला कोण मज्जाव करेल? असं त्यांनी म्हटलं आहे. त्यावेळी राज ठाकरे यांना विरोध करण्यासाठी तुम्हाला भाजपकडून सांगण्यात आलं होतं का? हा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी हे भाष्य केलं आहे.
Read also:
- अमित शहा, फडणवीसांवर गंभीर आरोप, तर शिवसेनेवर टिका; इम्तियाज जलील संतापले
- “सरकारने पेट्रोल डिझेलवरील कर कपात केलीच नाही”; ठाकरे सरकारने लोकांना मुर्ख बनविले; देवेंद्र फडणवीस
- राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याबाबत भाजपचाच डाव; बृजभुषण सिंह यांनीच दिली कबुली ?
- इडा पिडा टळो, अन् इडीचा ससेमिरा मरो; भावना गवळी यांच्यासाठी शिवसेनेकडून यज्ञ
- “बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही आता बकरीसेना झाली”; नारायण राणेंचा शिवसेनेवर घणाघात