पुणे: (विशेष प्रतिनिधी) राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून उमेदवार निश्चित झाला असून, कोल्हापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांना संधी मिळाली आहे. तर लवकरच त्यांच्या नावाची घोषणा करण्यात येणार असल्याचं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना डावलण्यात आले आहे.
हे पण वाचा, कोल्हापुरात भाजपची मोठी खेळी; शिवसेनेच्या विरोधात तगडा उमेदवार शर्यतीत
शिरुर लोकसभा मतदार संघातून सलग तीलवेळा खासदार राहिलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांना २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. पुणे जिल्ह्यात शिवसेनेला पुन्हा उभारी देण्यासाठी माजी खासदार आढळराव पाटील यांना संधी देणे अपेक्षीत होते. मात्र, ऐनवेळी आढळराव पाटील यांचा पत्ता कट करण्यात आला.
शिरुर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा संघर्ष शिगेला पोहोचला आहे. डॉ. अमोल कोल्हे यांच्या मदतीने राष्ट्रवादी शिवसेना ग्रामीण भागात शिवसेना पोखरुन काढत आहे. अशा परिस्थितीत पक्षश्रेष्ठींकडे शिवसैनिक आणि आढळराव समर्थकांनी तगदा लावला होता. पक्ष संघटन आणि ताकद वाढवण्यासाठी पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठी क्रेझ असलेले आढळराव पाटील यांना संधी द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती.
हे पण वाचा, संभाजी राजे यांचा राजकीय खेळ थांबवा, नाहीतर…; राज्यसभेच्या जागेसाठी मराठा क्रांती मोर्चा आक्रमक
दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी आढळराव पाटील हे खासदार होणार, अशी गर्जनाही केली होती. त्यामुळे राज्यसभेच्या सहाव्या जागेवर छत्रपती संभाजीराजे यांनी पक्षात प्रवेश न केल्यास आढळराव पाटील यांची वर्णी लागणार, असा कयास आढळराव समर्थकांनी बांधला होता. मात्र, सर्व अंदाज फोल ठरवत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरचे संजय पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
हे पण वाचा, कोणी कितीही आकडे मोड करा, सहावी जागा शिवसेना लढेल; राज्यसभेच्या ६ व्या जागेसाठी शिवसेना ठाम
त्यामुळे औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचाही पत्ता कट झाला. सलग चारवेळा खासदार राहिलेल्या खैरे यांना औरंगाबादमध्ये एमआयएमच्या उमेदवाराकडून त्यांना २०१९ मध्ये पराभव पत्कारावा लागला होता. कट्टर शिवसैनिक म्हणून खैरे यांनी संसद गाजवली. औरंबादमध्ये शिवसेनेचे गतवैभव परत मिळवण्यासाठी खैरे यांना संधी दिली जाईल, असाही अंदाज वर्तवला जात होता. मात्र, खैरे यांच्या पदरी पुन्हा निराशा पडली.
हे पण वाचा, राज्यसभेच्या उमेदवारीसाठी काँग्रेस पक्षात रस्सीखेच, ‘या’ नेत्यांची नावे आघाडीवर
संजय पवार कट्टर मग आढळराव, खैरे उपरे आहेत का?
शिवसेनेचे माजी खासदार शिवाराज आढळराव पाटील यांनी सलग तीनदा संसदेत प्रतिनिधीत्व केले आहे. पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीशी दोन हात करणारा तगडा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. दुसरीकडे, चंद्रकांत खैरे यांनी चारवेळा संसदेत प्रतिनिधीत्व केले आहे. औरंगाबादमध्ये शिवसेनेची पताका अभिमानाने मिरवणारा कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची राज्यभर ओळख आहे. आता संजय राऊत यांनी राज्यसभेवर संजय पवार यांच्या नावाची घोषणा करताना म्हणाले की, ‘‘ संजय पवार शिवसेनेचा मावळा आहेत… मावळे असतात म्हणूनच राजे आहेत…’’ असा संदर्भ देत संजय पवार यांचा उल्लेख ‘कडवट शिवसैनिक’ असा केला. आता संजय पवार कट्टर शिवसैनिक आहेत, मग आढळराव पाटील आणि चंद्रकांत खैरे काय शिवसेनेत उपरे आहेत का? असा उपरोधिक सवाल शिरुरमधील निष्ठावंत शिवसैनिकांकडून उपस्थित केला जात आहे.
Read also:
- औरंगाबादमध्ये भाजपचा ‘जल आक्रोश मोर्चा’; देवेंद्र फडणवीस दानवेंचं मोठं शक्तीप्रदर्शन
- ..तर तुला गृहमंत्र्यांच्या दारी उभं करू, अमरावतीची भाकरवडी
- राज ठाकरेंचं भाषण आघाडीतील प्रत्येक नेत्यांनी गांभीर्याने घेण्याची गरज; भास्करराव जाधव
- अमित शहा, फडणवीसांवर गंभीर आरोप, तर शिवसेनेवर टिका; इम्तियाज जलील संतापले
- “सरकारने पेट्रोल डिझेलवरील कर कपात केलीच नाही”; ठाकरे सरकारने लोकांना मुर्ख बनविले; देवेंद्र फडणवीस