कोल्हापुर : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संजय पवार यांचं नाव जाहीर केल्यानंतर शिवसेनेने सगळ्यानाच आश्चर्याचा धक्काच दिला आहे. त्यामुळे अपक्ष म्हणून निवडणुक लढविणाऱ्या संभाजी राजे यांना मोठा धक्का बसला आहे. तर शिवसेनेविरोधात भाजप देखील मोठी खेळी करण्याची शक्यता आहे.
धार्मिकतेवरून राज्यात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर..”; गृहमंत्र्यांनी मनसेला फटकारलं
आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी संजय राऊत यांची राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे संभाजी राजे यांच्या आशा मावळल्या आहेत. तर कोल्हापुरात भाजप मोठा डाव रचण्याच्या तयारीत आहे. कोल्हापुरचे माजी खासदार आणि पक्षाचे महाराष्ट्र प्रवक्ते धनंजय महाडिक यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोल्हापुरात दोन मल्लात कुस्ती रंगण्याची चिन्हे आहेत.
“ओबीसी हा भाजपचा डीएनए, तर ठाकरे सरकार आरक्षणाचे हत्यारे” फडणवीसांचा ठाकरे सरकारविरोधात एल्गार
विधानसभेच्या संख्याबळानुसार भाजप सहापैकी 2 खासदार सहज निवडून आणू शकतो. त्यामुळे पहिल्या जागेसाठी पियुष गोयल यांचं नाव जवळपास निश्चित झालं आहे. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या जागेसाठी पंकजा मुंडे. धनंजय मुंडे, विनोद तावडे आणि हर्षवर्धन पाटील यांची नावे चर्चेत आहेत. त्यामुळे यांच्यापैकी भाजप कुणाला उमेदवारी देणार. त्याकडे लक्ष आहे.
“तेल लावलेले पैलवान आणि गुडघ्यात अक्कल असलेले पैलवान”; मनसेचा शरद पवारांवर निशाणा
दरम्यान, राज्यसभेच्या निवडणुकीसाठी 31 मे पर्यंत अर्ज करण्याची शेवटी मुदत आहे. तर येत्या 10 जून रोजी यासाठी मतदान होणार आहे. त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष राजकीय पक्षांकडे लागून राहिलं आहे की, कोणता उमेदवार रिंगणार उतरणार आणि कोण बाजी मारणार. ?
Read also:
- “उद्धव ठाकरेंना देव तर मातोश्रीला मंदिर मानतो”; राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर होताच पवारांची प्रतिक्रिया
- “भाजपनेच राज ठाकरेंचा गेम केला”
- ‘आधारवड’, पवार साहेब ! काही फोटो चांगले असतात; राष्ट्रवादीने मनसेची केली बोलती बंद
- शिवसेनेने राज्यसभेच्या सहाव्या जागेचा केला फैसला ; खैरेंना डावलून पवारांना दिली संधी
- “बाळासाहेबांवरील राऊतांनी बनवलेला चित्रपट भयानक आपटला, पण दिघे साहेबांवरील अजूनही सुरू”