मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे जोपर्यंत उत्तर भारतीयांची माफी मागत नाही तोपर्यंत त्यांना अयोध्यामध्ये पाय ठेऊ देणार नाही. अशी भूमिका उत्तर प्रदेशचे भाजपचे खासदार बृजभुषण सिंह यांनी घेतली. त्यानंतर माझ्याविरोधात अयोध्या दौऱ्याबाबत सापळा रचल्याचं सांगून राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा स्थगित केला. तसेच याला खतपाणी हे महाराष्ट्रातूनच मिळालं असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यासंदर्भात मनसेकडून काही फोटो ट्विट केले. त्याला आता राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून देखील प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
औरंगाबादमध्ये भाजपचा ‘जल आक्रोश मोर्चा’; देवेंद्र फडणवीस दानवेंचं मोठं शक्तीप्रदर्शन
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी अलिकडेच राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह बृजभूषण सिंह यांचा एकत्रित असलेला फोटो ट्विट केला आहे. तसेच राज ठाकरे यांच्याविरोधात बृजभुषण यांना शरद पवारांनी उभे राहण्याचे सांगितले अशा चर्चा मनसेकडून पसरवण्यात आल्या. त्यावर आता राष्ट्रवादीने राज ठाकरे आणि शरद पवारांचा फोटो ट्विट केला आहे.
..तर तुला गृहमंत्र्यांच्या दारी उभं करू, अमरावतीची भाकरवडी
राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. त्यात राज ठाकरे आणि शरद पवारांचा एकत्रित हातात हात घेतलेला फोटो आहे. व त्यात असं लिहिलं आहे की, “आधारवड” पवार साहेब! काही फोटो चांगले ही असतात आणि खरेही. हिंदी भाषांतर जाणीवपुर्वक टाळले आहे. असंही त्यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरेंचं भाषण आघाडीतील प्रत्येक नेत्यांनी गांभीर्याने घेण्याची गरज; भास्करराव जाधव
दरम्यान, संदीप देशपांडे यांनी त्यात म्हटलं आहे की, तेल लावलेले पैलावान आणि गुडघ्यात अक्कल असलेले पैलवान यांची राजसाहेबानं विरोधात झालेली युती स्पष्ट दिसत आहे. अशा प्रकारचा आशाय संदीप देशपांडे यांनी ट्विट केला आहे. तो फोटो महाराष्ट्रातील एका कुस्ती आखाड्यातील दिसत आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्याविरोधात राष्ट्रवादी काॅंग्रेसनेच सापळा रचला असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
"आधारवड". पवार साहेब! (काही फोटो चांगले ही असतात आणि खरेही) (हिंदी भाषांतर जाणीवपपुर्वक टाळले आहे)@abpmajhatv @TV9Marathi @News18lokmat @saamTVnews @zee24taasnews @RajThackeray pic.twitter.com/ko0vIfX2th
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) May 24, 2022
Read also:
- शिवसेनेने राज्यसभेच्या सहाव्या जागेचा केला फैसला ; खैरेंना डावलून पवारांना दिली संधी
- “बाळासाहेबांवरील राऊतांनी बनवलेला चित्रपट भयानक आपटला, पण दिघे साहेबांवरील अजूनही सुरू”
- धार्मिकतेवरून राज्यात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर..”; गृहमंत्र्यांनी मनसेला फटकारलं
- “ओबीसी हा भाजपचा डीएनए, तर ठाकरे सरकार आरक्षणाचे हत्यारे” फडणवीसांचा ठाकरे सरकारविरोधात एल्गार
- “तेल लावलेले पैलवान आणि गुडघ्यात अक्कल असलेले पैलवान”; मनसेचा शरद पवारांवर निशाणा