मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेेने कोल्हापुरातील जिल्हाध्यक्ष संजय पवार यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे शिवसेनेकडून संभाजी राजे यांना पाठिंबा मिळणे आता अशक्य आहे. कारण शिवसेनेने संभाजी राजे यांना दिलेली ऑफर संभाजी राजे यांनी धुडगावून लावली आहे. यावरून आता संभाजी राजे यांच्या एका पोस्टरची सध्या संपुर्ण राज्यात चर्चा सुरू झाली आहे.
राज्यसभा निवडणुकीत माजी खासदार आढळराव पाटील यांना डावलले! संजय राऊत यांनी शब्द पाळला नाही
संभाजी राजे यांनी अलिकडेच पुण्यात राज्यसभेची निवडणुक अपक्ष म्हणून लढविणार असल्याची घोषणा केली होती. तसेच त्यांनी त्यावेळी स्वराज्य या संघटनेची देखील घोषणा करून टाकली. त्यानंतर त्यांनी राजकीय पक्षांना राज्यसभेच्या जागेसाठी पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते. मात्र शिवसेनेने सहाव्या जागेची घोषणा करताच संभाजी राजेंपुढे पेच निर्माण झाला.
औरंगाबादमध्ये भाजपचा ‘जल आक्रोश मोर्चा’; देवेंद्र फडणवीस दानवेंचं मोठं शक्तीप्रदर्शन
संभाजी राजे यांना पक्षात आल्यानंतर त्यांना राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात येईल, असं म्हटलं होतं. परंतु संभाजी राजे अपक्ष म्हणूनच निवडणुक लढविण्यावर ठाम राहिले. त्यानंतर शिवसेनेने संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आली. आता राज्यसभा नव्हे तर संपुर्ण राज्यच घेणार. इतिहासाची पुनरावृत्ती, महाराष्ट्रात स्वराज्यची निर्मिती, लक्ष्य 2024 असं त्या पोस्टवर लिहिलं आहे. तसेच त्या पोस्टरमध्ये संभाजी राजे यांचं देखील चित्र देण्यात आलं आहे.
..तर तुला गृहमंत्र्यांच्या दारी उभं करू, अमरावतीची भाकरवडी
दरम्यान, विधानसभेच्या संख्याबळानुसार भाजपला 2 दोन तर राष्ट्रवादी काॅंग्रेस, काॅंग्रेस, आणि शिवसेनेला प्रत्येकी एक जागा मिळणार. त्यामुळे सहाव्या जागेचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यावर सध्या राज्यात राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे.
Read also:
- काॅंग्रेसची गळती अजूनही सुरूच; कपिल सिब्बल यांची काॅंग्रेसला सोडचिठ्ठी
- मराठा समाजाने आता तरी या कावेबाजांचा डाव ओळखावा; राजू पाटलांचा संभाजी राजेंना पाठिंबा
- “शरद पवारांकडे लोकांना गुळ दाखवण्याची परंपरा, फडणवीसांनी ओबीसी आरक्षणाचं नेतृत्व करावं”
- “पुलवामाचे काय झाले बापाला विचारले का? “सोमय्यांचा ‘चिरीट तोमय्या’ उल्लेख करत दिपाली सय्यदचा सवाल
- “मराठा आरक्षणाला बेताल विरोध करणाऱ्या सदावर्तेच्या माध्यमातुन फडणवीसांनी आरक्षण घालवले”