पुणे : विधानसभेतील संख्याबळानुसार राज्यसभेसाठी भाजपला 2 तर आघाडीतील तिन्ही पक्षांना प्रत्येकी एक जागेवर विजय मिळवणे शक्य आहे. तर सहाव्या जागेसाठी शिवसेनेने कोल्हापुरचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपकडूनही पंकजा मुंडे, विनोद तावडे, हर्षवर्धन पाटील यांच्या नावांची चर्चा आहे. परंतु राष्ट्रवादीकडून पार्थ पवार यांच्या नावाचा विचार करणार का? याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता होती, तेव्हा त्यांनी काय केले ? धनंजय मुंडेंचा भाजपला सवाल
शिवसेनेकडून संजय राऊत आणि संजय पवार यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. तर भाजपची राज्यसभेसाठी उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. मात्र राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून अद्यापही त्या पद्धतीचे संकेत मिळाले नाहीत. मात्र मावळ मतदार संघातील तरूण तडपदार नेतृत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या नावावर राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून शिक्कामार्तोब होण्याची शक्यता आहे.
“मातंग समाजाचा आधारवड राज्य सरकारने मुळासकट उपटून टाकला”
2019 च्या लोकसभा निवडणुकीत पार्थ पवार यांचा शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी पराभव केला होता. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना आपला उमेदवार पुन्हा देण्याची शक्यता आहे. तसेच पार्थ पवार यांना 2024 मध्ये मावळमधून लोकसभेची उमेदवारी मिळावी, यासाठी राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या गोटातून अचानक लॉंबिंगला सुरवात झाली आहे. त्यांना मावळमधून उमेदवारी द्यायची झाल्यास शिवसेनेचे विद्यामान खासदार श्रीरंग बारणे यांचा आपोआप पत्ता कट होईल. त्यामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेस सध्याच्या राजकीय घडामोडींवर विचार करण्याची शक्यता आहे.
राज्यसभा नव्हे तर आता संपुर्ण ‘राज्य’ च घेणार; संभाजी राजेंनी निवडणुकीसाठी दंड थोपटले
दरम्यान, रोहित पवार यांनी देखील अलिकडे संकेत दिले होते की, पार्थ पवार यांना उमेदवारी मिळल्यास त्यांच्या प्रचारासाठी मवाळ मध्ये जाणार. तसेच आता मवाळ मतदार संघात राष्ट्रवादी आपली ताकद वाढवू पाहत आहे. त्यामुळे राज्यसभेच्या या जागेवर राष्ट्रवादीकडून पार्श पवारांना संधी देण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.
Read also:
- दहशतवाद्यांना पैसे पुरवल्या प्रकरणी यासीन मलिकला जन्मठेपची शिक्षा
- “मध्यप्रदेशला न्याय मिळाला पण महाराष्ट्राची पुन्हा फसवणूक झाली”; सुप्रिया सुळे
- मग अडीच वर्ष अजित पवार मंत्रालय झाडत बसले होते का? पडळकरांचा पवारांना खोचक सवाल
- राज्य सरकारचा बुरखा मुंबईतल्या आंदोलनानं आज टराटरा फाडला
- “मनात काहीच किंतु-परंतु नाही, परंतु मी भाजपच्या दोन नेत्यांची शिकार करणार”