मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संबंधित भ्रष्टाचारप्रकरणी सीबीआयच्या मंजुरीनंतर निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे माफिचा साक्षीदार बनला आहे. माफीचा साक्षीदार बनल्यानंतर वाझेला आवश्यक सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडाव्या लागतील, असं सीबीआयने म्हटले आहे. यावर आता काॅंग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी भाष्य केले आहे. तसेच त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्यांवर देखील टिका केली आहे.
पार्थ पवारांना राज्यसभेची उमेदवारी देऊन राष्ट्रवादी मवाळमध्ये ताकद वाढवणार का?
सीबीआयची भूमिका प्राथमिक चौकशी अहवालापासून संदिग्ध आहे. १०० कोटी वसूली आरोपात ही काही मिळाले नाही. ज्या बारमालकांनी पैसे दिले ते गजाआड का नाहीत? याचे उत्तर नाही. गेल्या ८ वर्षांत तपास यंत्रणांचा सूडाच्या राजकारणासाठी केलेल्या वापरामुळे कायदेव्यवस्थेवर दूरगामी दूष्परिणाम होत आहेत. सीबीआय सचिन वाझे सारख्या आरोपीला जो ॲटिलीया समोर ठेवलेल्या स्फोटक व मनसुख हीरेन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे त्याला माफीचा साक्षीदार बनविण्यासाठी प्रयत्न करत आहे. ज्याच्यावर अनेक गुन्हे प्रलंबित आहेत अशा आरोपीला माफीचा साक्षीदार कसे बनवले जाऊ शकते? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
दहशतवाद्यांना पैसे पुरवल्या प्रकरणी यासीन मलिकला जन्मठेपची शिक्षा
भाजप नेते किरीट सोमय्यांनी अलिकडेच मुख्यमंत्र्यांबाबत अतिशय खालच्या पातळीची भाषा केली होती. त्यावर बोलताना सांवत म्हणाले की, राज्याच्या मुख्यमंत्र्यांसंदर्भात ही भाषा कोणी असंस्कृत, असंस्कारी व महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेशी असंबंधित व्यक्तीच बोलू शकेल. किरीट सोमय्या या व्यक्तीमत्वाला या तीनही विशेषणांसह अनैतिक, अविश्वसनीय, आक्रस्ताळे,अजागळ इत्यादी अनेक ‘अ’कारातील विशेषणे लागू पडतात. अशी खोचक टिप्पणी केली आहे.
“मध्यप्रदेशला न्याय मिळाला पण महाराष्ट्राची पुन्हा फसवणूक झाली”; सुप्रिया सुळे
महाराष्ट्राच्या इतिहासात असा तुच्छा मुख्यमंत्री कधी पाहिला नसेल, अशा पद्धतीचं वक्तव्य किरीट सोमय्यांनी केलं होतं. त्यावरून किरीट सोमय्यांवर शिवसेनेकडून जोरदार टिका करण्यात आली होती. यातच आता काॅंग्रेस नेते सचिन सावंत यांनी देखील सोमय्यांवर निशाणा साधला आहे.
Read also:
- “यावर शेंबडं पोर तरी विश्वास ठेवेल”? राऊतांच्या प्रश्नावर चंद्रकांत पाटलांचं जोरदार प्रत्युत्तर
- “८ वर्षात मी माझं डोकं कुणापुढं झुकू दिलं नाही”; पंतप्रधान नरेंद्र मोदी
- “चंद्रकांत पाटील हे शिवाजी महाराजांचे वंशज आहेत का”? संजय राऊत भडकले
- एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची नोकरी जाणार? केंद्र सरकारकडून हालचाली सुरू
- “प्रत्येक आमदारकीची निवडणुक आली की माझ्या नावाची चर्चा होते”; पंकजा मुंडे