मुंबई : ओबीसी आणि पद्दोन्नतीमधील आरक्षणाच्या मुद्यावरून भाजप नेते गोपीचंद पडळकर आक्रमक झाले आहेत. यावर आता पडळकरांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस हाच सर्वात जातीयवादी पक्ष असल्याची टीका करतानाच 5 वर्षाच्या पोराला झोपेतून उठवून जरी विचारलं, तरी ते सांगेल, कोणता पक्ष जातीयवादी आहे, असे म्हणत पडळकरांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.
पदोन्नतीमध्ये मागासवर्गीय आहेत, भटक्या विमुक्त जाती-जमाती आहेत, एससी-एसटी आहेत, तसेच विशेष मागास प्रवर्गही आहे. या सर्वांच्या बाबतीत, ज्या समितीचे अध्यक्ष अजित पवार आहेत. त्यांनी, या सर्व अधिकाऱ्यांच्या करिअरवर गाढवांचा नांगर फिरविण्याचं काम केलंय, अशी टीका त्यांनी केली.
उजनी धरणाच्या पाणी प्रश्नावरून सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना हटवणार असल्याच्या देखील चर्चा आहेत. यावर बोलताना पडळकर म्हणाले की, ते धनगर समाजाचे पालकमंत्री आहेत, त्यांना हटविण्याची मोहीम राष्ट्रवादीच्याच काही नेत्यांकडून होत आहे, असे ते म्हणाले.
Read Also :