मुंबई – शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीकडून छापेमारी सुरु आहे. त्यांचे सुपूत्र विहंग सरनाईक आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घरीही ईडीने छापेमारी कारवाई सुरु असून मात्र या छापेमारीमगच कारण अद्याप अस्पष्ट आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सरनाईक यांच्या घरी आणि कार्यालयात सुरू असलेल्या छापेमारीचं स्वागत केले आहे.
‘शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरासह कंपन्यांच्या कार्यालयांवर धाडी टाकल्या जात आहेत. बेनामी, बोगस आणि भ्रष्टाचाराचा पैसा असेल तर कारवाई व्हायला हवी. शिवसेनेचे नेते आणि त्यांचे मुखियादेखील अशाच प्रकारचे उद्योग करतात हे सगळ्यांना माहीत आहे,’ असं किरीट सोमय्या म्हणाले.
‘मनी लॉण्ड्रिंगसारख्या प्रकरणात शिवसेना पटाईत आहेत. त्यांचे मुखिया यामध्ये अग्रेसर आहेत. त्यामुळे मला याबद्दल कोणतंही आश्चर्य वाटत नाही. मुंबई महापालिकेत माफिया राज असल्याचा आरोप मी आधीही केला आहे. पालिकेतून कंत्राट, भागिदारीतून प्रचंड पैसा येत असतो,’ असे म्हणत किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर देखील निशाणा साधला.
या प्रकरणी अद्याप शिवसेनेकडून कोणत्याही नेत्यानं प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र शिवसेना नेते थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार असल्याचं समजतं. मात्र ही कारवाई राजकीय स्वरूपची असून ती सूडबुद्धीनं सुरू असल्याचा सूर पक्षात आहे. अर्णब गोस्वामी, कंगना राणौत प्रकरणात सरनाईक यांनी अतिशय आक्रमकपणे पक्षाची बाजू लावून धरली होती. त्यामुळेच त्यांना लक्ष्य करण्यात येत असल्याची चर्चा शिवसेनेत आहे
Read Aslo –
आमदार प्रताप सरनाईकांच्या घरी ईडीचे छापे
गेल्या 6 वर्षात एकातरी भाजप नेत्याच्या घरावर ईडीने छापा टाकला का?, सावंतांचा सवाल
‘आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही .. ‘; ईडीच्या छापेमारी नंतर राऊतांची प्रतिक्रिया