मुंबई : महाविकास आघाडी आणि प्रामुख्याने शिवसेनेवर सातत्याने टीका करणारे भाजप नेते निलेश राणे यांच्याकडे आता पक्षाने मोठी जबाबदारी सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपने निलेश राणे यांची महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी नियुक्ती केली आहे.
ग्रामपंचायत निवडणूकीत कोकणसह सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात भाजपला मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईत आयोजित बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.
भारतीय जनता पक्षाने माझ्यावर महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी नियुक्ती केली आहे. त्याबद्दल मी @Dev_Fadnavis @ChDadaPatil याचं मनापासून आभारी आहे. pic.twitter.com/YJO2mk7hbq
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) January 20, 2021
दरम्यान, निलेश राणे यांचे वडील आणि भाजप नेते नारायण राणे यांची ठाकरे सरकारने सुरक्षा कपात करण्याचा निर्णय घेतला होता. राज्य सरकारने त्यांची सुरक्षा कपात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता केंद्र सरकारने त्यांना वाय श्रेणीची सुरक्षा पुरवली आहे.
नारायण राणेंना देण्यात आलेल्या वाय दर्जाच्या सुरक्षेत 12 सी. आय. एस. एफचे जवानांचा समावेश असेल.
Read Also :
- ‘चंद्रकांत पाटलांना कोल्हापुरातूनही निवडून आणू’
- … म्हणून अभिजीत बिचुकले थेट ठाकरे सरकारविरोधात करणार आंदोलन
- कोरोना काळात दाखल करण्यात आलेले ‘ते’ गुन्हे मागे घेणार, गृहमंत्र्यांची माहिती
- ‘धनंजय मुंडे चौकशीत दोषी आढळले तर…’, शरद पवारांचे स्पष्टीकरण
- अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बाइडन यांचं आहे थेट नागपूरशी नातं