मुंबई : तौक्ते चक्रीवादळामुळे कोकणातील काही भागांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या भागांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपासून ते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील कोकणात पोहचले. मात्र आता या दौऱ्यांवरून जोरदार टीका-टिप्पणी सुरू झाली आहे.
भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी नुकसानीची पाहणी करण्यासाठी कोकण दौरा केला. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी सर्वसामान्य लोकांमध्ये जाताना राज्याच्या दोन्ही विरोधी पक्षनेत्यांना नवीन बूट खरेदी करावे लागतात, यासारखे आश्चर्य नाही, अशी टीका भाजप नेत्यांच्या एकसारख्या बुटांवरून केली होती. यावर आता प्रवीण दरेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
विरोधी पक्ष नेत्यांच्या बुटांकडे लक्ष देण्यापेक्षा नुकसानग्रस्त कोकणवासीयांना मदत करा!, अन्यथा, पुमा, नायकी बाजूला राहिलं, कोकणवासीय 'कोल्हापुरी चप्पल' हातात घेऊन नवाब भाईंचं स्वागत करतील..!
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) May 22, 2021
विरोधी पक्ष नेत्यांच्या बुटांकडे लक्ष देण्यापेक्षा नुकसानग्रस्त कोकणवासीयांना मदत करा!, अन्यथा, पुमा, नायकी बाजूला राहिलं, कोकणवासीय ‘कोल्हापुरी चप्पल’ हातात घेऊन नवाब भाईंचं स्वागत करतील, असा जोरदार टोला प्रवीण दरेकरांनी नवाब मलिक यांना लगावला आहे.
दोन्ही विरोधी पक्षनेते एकसारखे नवीन बूट घातलेले दिसत आहेत. त्यामध्ये त्यांनी ‘नायकी’चे की ‘पूमा’ चे बूट घातलेत, हे माहित नाही, परंतु फोटोत मात्र एकसारखेच बूट दिसत आहेत, असा टोला याआधी नवाब मलिक यांनी लगावला होता. यावर आता दरेकरांनी प्रत्युत्तर दिले आहे.
Read Also :
- ‘महाराष्ट्राने कधीही कोरोनाची आकडेवारी लपवली नसल्याने…’
- परमबीर सिंह यांना तूर्तास दिलासा, सोमवारपर्यंत अटक न करण्याचे न्यायालयाचे निर्देश
- ‘मुख्यमंत्री साहेब, चक्रीवादळाला लाजवेल असा तुमच्या दौऱ्याचा वेग’
- महाराष्ट्रात 1 जूननंतर लॉकडाउन पुन्हा वाढणार ? मुख्यमंत्री म्हणाले…
- ‘मुख्यमंत्र्यांचा दौरा म्हणजे केवळ दर्शनाचा कार्यक्रम’