मुंबई : तौक्ते चक्रीवादळानंतर कोकण किनारपट्टीभागातील मोठे नुकसान झाली. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दौरा केला. मुख्यमंत्र्यांच्या आधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी देखील नुकसानीची पाहणी केली होती. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर आता भाजप नेत्यांकडून सडकून टीका केली जात आहे.
मुख्यमंत्र्यांचा दौरा म्हणजे केवळ दर्शनाचा कार्यक्रम, अशा शब्दात प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. कोकणात चक्रीवादळ नुकसानीची पाहणी, विरोधी पक्ष नेते ‘तीन दिवस. मुख्यमंत्री ‘तीन तास’ विरोधी पक्षनेते कोकणवासीयांच्या बांधावर, उंबरठ्यावर जाऊन विचारपूस आणि मुख्यमंत्र्यांचा, केवळ ‘दर्शनाचा कार्यक्रम’, असे म्हणत प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना टोला लगावला.
कोकणात चक्रीवादळ नुकसानीची पाहणी!
विरोधी पक्ष नेते…
'तीन दिवस'मुख्यमंत्री…
'तीन तास'विरोधी पक्ष नेते,
कोकणवासीयांच्या बांधावर
उंबरठ्यावर जाऊन विचारपूसमुख्यमंत्र्यांचा,
केवळ 'दर्शनाचा कार्यक्रम'— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) May 21, 2021
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील मुख्यमंत्री ठाकरेंच्या दौऱ्यावरून टीका केली. मुख्यमंत्र्यांचा दौरा किती तासांचा आहे. केवळ तीन तासांचा दौरा आणि किती किलोमीटरचा दौरा हे मोजून सांगू का?, अशी खोचक टीका त्यांनी केली.
मुख्यमंत्री नुसत्या बाता मारतात. गतवर्षी येऊन गेलेल्या निसर्ग चक्रीवादळाची नुकसानभरपाई अजूनही सरकारने दिलेली नाही. मुख्यमंत्री केवळ मोठमोठी राजकीय विधानं करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ गुजरातमध्ये का गेले असा सवाल करता? मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केवळ दोनच जिल्ह्यात का आले? इतर जिल्ह्यात का जात नाही?, असा सवाल देखील फडणवीसांनी केला.
Read Also :