पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी, “राज्यपाल यांचं वय झालं आणि शरद पवार साहेब यांचं वय झालं नाही का?,” असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर खोचक पलटवार केला होता. दरम्यान, त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी प्रत्युत्तर दिलं असून, “चंद्रकांतदादा, तुमचं जेवढं वय आहे तेवढी पवारांची संसदीय कारकिर्द आहे. हे कोथरूड व्हाया आमदार झालेल्या दादांनी लक्षात घ्यावं, ” असा बोचरा वार त्यांनी केला आहे.
“चंद्रकांतदादा, जेवढं तुमचं वय, तेवढी पवारांची संसदीय कारकीर्द”, रुपाली चाकणकरांचा जोरदार वार
त्यांनी एक व्हिडीओ ट्विट करून पाटलांवर टीका केली आहे. १२ आमदारांच्या नियुक्तीवरून शरद पवारांनी राज्यपालांवर शरसंधान साधले होते. “राज्यपालांना वयोमानामुळे लक्षात राहत नसावं, म्हणून सदस्यांच्या नियुक्त्या रखडल्या असाव्यात,” असं ते म्हणाले होते. त्यांनतर चंद्रकांत पाटील यांनी राज्यपालांची पाठराखण करत पवारांवर टीका केली होती. त्यावर आता चाकणकरांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप, SIT नोंदवणार आमदार संजय राठोड यांचा जबाब
दरम्यान, यावर आता भाजपकडून महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांनी, रुपाली चाकणकर यांच्यावर हल्लाबोल केला असून, “अहो रुपालीताई, आपला अनुभव किती, राजकीय कारकीर्द काय? आपण कोणाविषयी बोलत आहोत? शरद पवार असतील, चंद्रकांत पाटील असतील किंवा अमित शहा असतील यांच्याविषयी बोलण्याएवढा आपला राजकीय अनुभव नाही. तुम्ही भान ठेवा, आपण कोणाच्या कारकिर्दीविषयी बोलत आहोत, तुमची राजकीय शूर्पणखा होऊ देऊ नका!” असा सल्ला त्यांनी दिला आहे.
न्यायालयच्या दणक्यानंतर अनिल देशमुखांना ईडीचे पाचव्यांदा समन्स!
१२ आमदारांच्या नियुक्तीवरून शरद पवारांनी राज्यपालांवर शरसंधान साधले होते. “राज्यपालांना वयोमानामुळे लक्षात राहत नसावं, म्हणून सदस्यांच्या नियुक्त्या रखडल्या असाव्यात,” असं ते म्हणाले होते. त्यांनतर चंद्रकांत पाटील यांनी राज्यपालांची पाठराखण करत, “राज्यपाल यांचं वय झालं आणि शरद पवार साहेब यांचं वय झालं नाही का?,” अशी पवारांवर टीका केली होती.
Read Also :
- “बाळासाहेबांशी बेईमानी करणाऱ्या घरफोड्या शिवसैनिकाला स्मृतीस्थळाची भेट घेऊ देणार नाही!”
- राज्य भाजप नेत्यांवर पंकजा मुंडे अजूनही नाराज? रावसाहेब दानवेंचा मोठा खुलासा!
- शिवसेनेला महाराष्ट्रातून संपविल्याशिवाय राहणार नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांचे वक्तव्य
- फरार गजानन काळेंना लवकरात लवकर अटक व्हावी, संजीवनी काळे यांचे केंद्रीय मंत्र्याना साकडे
- या सरकारने राज्यातील जातीय स्थिती बिघडवली, आघाडी सरकारकडून जनतेची फसवणूक सुरु