मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यातील आगामी स्थानिक निवडणुका आणि विधानसभा निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा दिला आहे. गेल्या काही दिवसात सत्तेत असून देखील काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आता नाना पटोले यांनी भाजपचे काही मोठे नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे म्हटले आहे.
नाना पटोले यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधींच्या जन्मदिनी अनेक नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे म्हटले आहे.
माजी मंत्री आणि भाजपचे माजी आमदार डॉ सुनील देशमुख हे लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, घरवापसी आहे आणि जशास तसे अजून उत्तर द्यायचं आहे. विदर्भातील काही बडे नेते काँग्रेस पक्षात राहुल गांधींच्या जन्मदिनी प्रवेश करतील. हा एक ट्रेलर आहे संपूर्ण पिक्चर अद्याप बाकी आहे.
राहुल गांधी यांचा 19 जूनला वाढदिवस आहे. त्यामुळे आता कोणते नेते काँग्रेसच्या वाटेवर आहेत, याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
Read Also :
- मराठा आरक्षण : प्रलंबित प्रश्नांवर तातडीने मार्ग काढण्याचे निर्देश; समन्वयासाठी समितीही नेमा – उद्धव ठाकरे
- ‘राज्य सरकार मागण्यांबाबत सकारात्मक, मात्र अद्याप आंदोलन स्थगित झालेलं नाही’
- ‘मनसुख हिरेन आणि सचिन वाझे प्रकरणी अटक झालेल्या सगळ्यांचे ‘गॉडफादर’ उद्धव ठाकरे?’
- एनआयए कडून एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांना अटक, आजच सेशन कोर्टात हजर करणार
- एनआयए कडून एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांना अटक, आजच सेशन कोर्टात हजर करणार