मुंबई : ओबीसी आरक्षणावरून भाजपमधील ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणावरूनही भाजपच्या मराठा नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. आता धनगर आरक्षणावरून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दंड थोपटले आहेत. राज्य सरकारने धनगर समाजाला प्राधान्याने आरक्षण द्यावे किंवा जे आदिवासींना ते धनगर समाजाला योजना लागू करावी, अशी मागणी करणारे पत्र त्यांनी, आज राज्यपालांची भेट घेऊन त्यांना सुपूर्त केले.
उत्तराखंडमध्ये मोठा राजकीय भूकंप; अमित शहांनी समजावल्यानंतरही ३५ आमदार राजीनामा देणार
“धनगर समाजाच्या ST आरक्षणाची अंमलबजावणी तसेच जोपर्यंत ST आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत जे आदिवासींना ते धनगर समाजाला योजना लागू करून २०१९-२० चे १००० कोटी रु. व २०२०-२१ चे १००० कोटी रु. मंजूर करण्याच्या सुचना राज्य सरकारला कराव्यात या मागणीसंदर्भात आज राजभवन, मुंबई येथे महामहीम राज्यपाल मा.भगतसिंह कोश्यारी जी यांची भेट घेतली. यावेळी धनगर समाजाची पारंपरिक घोंगडी, काठी व पिवळा फेटा देऊन सत्कार केला. तसेच निवेदन दिले,” असे सांगणारी पोस्ट फेसबुक वर शेअर करत त्यांनी याची माहिती दिली.
सरकार पाडण्यासाठी चंद्रकांतदादांनी अमित शहांना पत्र लिहिलं – रोहित पवार
दरम्यान, देवेंद्र फडणवीस सरकारने धनगर समाजासाठी, जे आदिवासींना तेच धनगरांना असं धोरण ठरवून योजना मंजूर केली होती. त्यासाठी, १००० कोटी रुपयांची तरतूद केली होती. पण त्यातील एक रुपयाही महाविकास आघाडी सरकारनं दिला नाही. यशवंत महामेश योजनाही राज्य सरकारनं रद्द केली. हे सरकार धनगर, भटक्या विमुक्त समाजाच्या विरोधात असल्याचा गंभीर आरोप पडळकरांनी सरकारवर काही दिवसांपूर्वी केला होता.
Read Also :
- मंत्र्याच्या मुलाने आत्महत्या केल्यावरच सरकारला जाग येणार का?, त्या आईचा आक्रोश
- नियम झुगारून सोलापूरात मराठा मोर्चा; आमदार समाधान औताडे पोलिसांच्या ताब्यात
- राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी; महादेव जानकरांना पोलिसांनी घेतले ताब्यात
- शिवसेना-भाजप एकत्र येणार?, अशिष शेलारांच्या भेटीवर संजय राऊत म्हणतात…
- …तर शिवसेना पुन्हा भाजप सोबत युती करणार; सुधीर मुनगंटीवारांचा दावा