मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन विधानसभेत जोरदार राडा पाहायला मिळाला. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात झालेल्या धक्काबुक्कीनंतर भाजपच्या १२ आमदारांचं १ वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे. तत्त्पूर्वी अधिवेशनातील चर्चेदरम्यान भाजपाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या विधानावरून काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला. भाजपाचे आमदार काय धमकी देत आहेत का? सभागृहात धमकी दिली जात आहे, काय सुरु आहे? असा संतप्त सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विचारला आहे.
‘‘नितीन गडकरींचे कारखाने योग्य पद्धतीने चालू आहेत’’; चंद्रकांत पाटलांचे घुमजाव
‘सभागृहाचे कामकाज सुरु असताना सत्ताधारी पक्षाचे सदस्य बोलू लागताच भाजपाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं. विधिमंडळात मध्येच बोलले म्हणून अनिल देशमुख आता आतमध्ये जात आहेत हे मुनगंटीवार यांचे वक्तव्य धमकी देणारे आहे. सभागृहातच धमकी देण्यापर्यंत भाजपची मजल गेली आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर असून ईडी, आयकर, सीबीआय सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून भाजप विरोधी पक्षांच्या लोकांना नाहक त्रास देत असल्याची ही कबुलीच आहे. हा सत्तेचा दुरुपयोग असून महाराष्ट्रात हा खेळ केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून भाजपाने चालवला आहे हे लोकशाहीला घातक आहे, असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला आहे.
“ओबीसींच्या इम्पिरीकल डेटाचा ठराव, म्हणजे ठाकरे सरकारचं वेळकाढूपणाचं धोरण”- देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणारा विद्यार्थी स्वप्नील लोणकर याच्या आत्महत्येचा मुद्दा विधानसभेत गाजला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे विधानसभेत आक्रमक झालेले पाहायला मिळाले आहेत. सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत स्वप्नील लोणकर याच्या आईचा व्हिडीओ स्क्रीनवर दाखवा. स्वप्नीलच्या आईचा आक्रोश प्रशासनातील निगरगट्ट अधिकाऱ्यांना आणि महाविकास आघाडी सरकारला पाहूद्या, अशी मागणी केली.
Read Also :
- भाजप आमदारांनी मला आई-बहिणीवरुन शिव्या दिल्या – तालिका अध्यक्षांचा खळबळजनक आरोप
- भाजपचे १२ आमदार निलंबित करण्यासाठी ठाकरे सरकारचा पुर्वनियोजित कट
- ओबीसी आरक्षणासाठी केंद्राने इम्पेरिकल डेटा द्यावा, ठाकरे सरकारकडून विधानसभेत ठराव मंजूर
- केंद्र सरकार एम्पिरिकल डाटा देत नाही; विधानसभेत ठरावावरून फडणवीस-भुजबळ आमने-सामने
- विधानसभेत एमपीएससीच्या रिक्त जागांबाबत, उपमुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा!