नाशिक : राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी प्रचार करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. महाविकास आघाडीकडून शुंभागी पाटील तर त्यांच्याविरोधात डॉ. सत्यजीत तांबे मैदानात उभे राहिले आहेत. यातच सत्यजीत तांबे यांना निवडून आणण्यासाठी तयारी करा. असे आदेश भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना दिले आहेत.
“आयुष्य अन् समाज घाण घडवणे हा भाजपचा एकच कार्यक्रम”, रूपाली पाटील भाजपवर संतापल्या
ऐनवेळी काॅंग्रेसचे उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी महाविकास आघाडीविरूद्ध बंडाळी केल्यानंतर मोठा गोंधळ निर्माण झाला होता. त्यानंतर काॅंग्रेसने सुधीर तांबे आणि सत्यजीत तांबे यांच्यावर निलंबणाची कारवाई केली. त्यानंतर सत्यजीत तांबे यांनी अपक्ष म्हणून नाशिकच्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत अर्ज दाखल केला आहे. त्यांना आतापर्यंत अनेक नेत्यांनी पाठिंबा दिला आहे.
“भाजपने सर्वात जास्त हल्ले शरद पवारांवर केलेत”, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
मागील काही दिवसापासून सत्यजीत तांबे यांना भाजप पाठिंबा देणार असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. त्यानंतर आज प्रचाराचा शेवटचा दिवस असून सगळेच उमेदवार प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. सत्यजीत तांबे यांनी देखील आज अहमदनगर याठिकाणी जाहीर सभा घेतली. त्यामुळे या निवडणुकीत आता कोण बाजी मारणात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also
- भोसरीतील ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात ८ हजार विद्यार्थी- पालकांचा सहभाग , मोदींच्या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण
- “कितीही गुन्हे दाखल करा, माझ्यावर त्याचा काहीही फरक पडणार नाही”, संतोष बांगर
- “बाळासाहेब ठाकरे, वीर सावरकरांना भाजप विसरले”, सामानातून भाजपवर हल्लाबोल
- “पोटनिवडणुका बिनविरोध होण्यासाठी भाजप सर्व पक्षांना पत्र पाठवणार”
- “कोश्यारींच्या जागी, सुमित्रा महाजन की अमरिंदरसिंग ?,; येत्या 15 दिवसात राज्याचा राज्यपाल ठरणार”