हिंगोरी : कळमनुरीचे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राचार्यांला मारहाण केल्याप्रकरणी बांगर यांच्यासह शिवसेनेच्या 30 ते 40 जणांना दहा दिवसानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माझ्यावर कितीही गुन्हा दाखल झाला तरी त्याचा काही फरक पडत नाही. अशी प्रतिक्रिया संतोष बांगर यांनी दिली आहे.
“मोदी साहेब..! NDTV ला अडाणींनी विकत घेतंल, आता BBC ला कोण विकत घेईल?” राष्ट्रवादीने डिवचलं
ज्या प्राचार्याला मी मारहाण केली आहे. त्याच्यावर 354, अस्ट्रोसिटी सारखे अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. या प्राचार्याला विरोधकांनी माझ्यावर गुन्हा दाखल करायला लावला आहे. ती माझ्यासाठी मोठी गोष्ट नाही, अन् त्याचा माझ्यावर काहीच फरक पडणार नाही. तसेच दहा दिवसानंतर माझ्यावर गुन्हा दाखल झाला. मग यावेळी तुम्ही झोपी गेला होता का? असा सवाल संतोष बांगर यांनी केला आहे.
थोरातांचा पाठिंबा नेमका कुणाला ? शुंभागी पाटील कि सत्यजीत तांबे?
हिंगोलीतील पॉलिटेक्निक महाविद्यालयातील प्राचार्याला मारहाण केल्याचा व्हिडीओ मध्यंतरी व्हायरल होत होता. त्यानंतर संतोष बांगर यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राजकीय वर्तुळातून होऊ लागली. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रकरणाची चौकशी करून संतोष बांगर यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं म्हटलं होतं.
दरम्यान, त्या प्राचार्यावर असे अनेक गुन्हे दाखल झाले असून त्याची आतापर्यंत 13 वेळा बदली करण्यात आली आहे. असं म्हणत त्यांनी कोल्हापुरमधील संबंधीत व्यक्तीचा संतोष बांगर यांनी एक व्हिडीओ देखील दाखवला. त्यामुळे या प्रकरणावरून आता पुढे काय घडते ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also
- “बाळासाहेब ठाकरे, वीर सावरकरांना भाजप विसरले”, सामानातून भाजपवर हल्लाबोल
- “पोटनिवडणुका बिनविरोध होण्यासाठी भाजप सर्व पक्षांना पत्र पाठवणार”
- “कोश्यारींच्या जागी, सुमित्रा महाजन की अमरिंदरसिंग ?,; येत्या 15 दिवसात राज्याचा राज्यपाल ठरणार”
- “आयुष्य अन् समाज घाण घडवणे हा भाजपचा एकच कार्यक्रम”, रूपाली पाटील भाजपवर संतापल्या
- “भाजपने सर्वात जास्त हल्ले शरद पवारांवर केलेत”, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट