मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षात मोठी खळबळ उडाली आहे. शरद पवार यांनी अध्यक्ष पदावर कायम रहावं, अशी नेत्यांसह कार्यकर्त्यांची मागणी आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख समितीची यावर बैठक पार पडत आहेत. या बैठकीत शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर करण्यात आला आहे.
हेही वाचा…शरद पवारांनी अखेर भाकरी फिरवली! मोठी घोषणा करताच राष्ट्रवादीच्या नेत्यांना अश्रू अनावर
प्रफुल्ल पटेल, विरोधीपक्ष पक्षनेते अजित पवार तसेच राष्ट्रवादीमधील प्रमुख नेत्यांचा या समितीमध्ये समावेश आहे. दरम्यान, आता समितीच्या निर्णयानंतर शरद पवार काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा…Big News: शरद पवार यांचा मोठा निर्णय, अध्यक्षपदावरुन निवृत्ती
दरम्यान एका बाजूला राष्ट्रवादी कार्यालयात समितीची बैठक सुरू असताना बाहेर राज्यभरातील कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून केला जात आहे. याच दरम्यान एका कार्यकर्त्यांने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.
हेही वाचा…“उद्धव ठाकरे आजारी असताना आदित्यने मुख्यमंत्री होण्याचे षडयंत्र रचले”
भिवंडी शहाराध्यांनी शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवास स्थानी आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र राष्ट्रवादीच्या इतर कार्यकर्त्यांनी योग्य वेळी रोखल्याने हा अनर्थ टळला. मागील तीन दिवसापासून शरद पवार यांना विनंती करत आहे. शरद पवारच आमचे नेते आहेत. त्यांनीच राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी राहावं असं त्यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“मी पुन्हा येईन, तो कसा येतो, ते तुम्हाला….”, तापलेल्या राजकारणात फडणवीसांचं सुचक विधान
हेही वाचा…“राष्ट्रवादीचा अॅक्शन प्लॅन तयार, पुढचा अध्यक्ष ठरला, बैठकीत दोन प्रस्ताव ?”
हेही वाचा…अजित पवारांना धक्का : हवेली बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादीचा ‘सुपडा साप’
हेही वाचा…‘आता लोकांची खात्री पटली, राष्ट्रवादीने उद्धव ठाकरेंची शिवसेना संपवली’
हेही वाचा…फॅक्ट चेक : निगडीतील शिवसृष्टीला तर महाविकास आघाडीच्या काळातच ‘खोडा’