पुणे – राज्यात बैलगाडा शर्यतीची प्राचीन परंपरा आहेच मात्र तो शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा आणि अतिशय आवडीचा छंद म्हणून या शर्यतींकडे पाहिलं जातं मात्र हायकोर्टाने या शर्यतींवरती बंदी घातल्यापासून शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे आणि त्यामुळेच बैलगाडा मालक आणि राज्य सरकारवर या शर्यती सुरु करण्यासाठी विनंती आणि दबाव आणत होते. राज्यातील बैलगाडा शर्यंतींवरील बंदी हटवण्याबाबत महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेची आज सुनावणी सुप्रीम कोर्टात पार पडली.
बैलागाडा शर्यतीचा आज होणार ‘फैसला’; आमदार महेश लांडगेंनी दिल्लीत तळ ठोकला !
अखेर बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून बळीराजाचा असलेला लढा अखेर यशस्वी झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींना सशर्त मंजुरी दिली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं राजकीय नेत्यांकडून स्वागत केले जात आहे. पुण्यवंत हडपसर मतदारसंघाचे आमदार योगेश टिळेकर यांनी देखील या निर्णयाचे स्वागत करत आमदार महेशदादा लांडगे यांच्या प्रयत्नांना यश आल्यामुळे त्यांचे अभिनंदन देखील केले आहे.
तुम्ही कायम माझ्या हृदयात रहाल; रुपाली पाटील यांचं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना भावनिक पत्र
ते म्हणाले,” सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे २०११ पासून महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीवरील कोर्टाने बंदी घातली होती मात्र आमदार महेशदादा लांडगे बैलगाडा शर्यती परत सुरू वकरण्यासाठी प्रयत्नशील होते. मात्र महाराष्ट्र शासनाने एप्रिल २०१७ मध्ये बैलगाडा शर्यती सशर्त सुरू करण्याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने कायदा केलेला आहे. परंतु, या कायद्यास काही शर्यत विरोधकांनी न्यायालयात आव्हान दिले. परिणामी, गेल्या चार वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात हा खटला प्रलंबित होता. मात्र आमदार महेश दादा लांडगे यांनी सातत्याने या खटल्याचा पाठपुरावा केला. स्वतः त्यांनी वैयत्तिक लक्ष घातलं. आमदार महेश लांडगे यांच्या प्रयत्नामुळेच बैलगाडा शर्यती परत सुरू केल्या असून त्यांनी महाराष्ट्रातील शेतकरी वर्गाला न्याय मिळून दिला. यात त्यांचे खूप मोठं यश आहे. त्यामुले मी आदरणीय महेशदादा लांडगे यांचे अभिनंदन करतो त्यांच्यामुळे आज महाराष्ट्रील शेतकरी खऱ्या अर्थाने आनंदित झाला आहे.
Read Also :
- बैलगाडा शर्यत लढा : विजय महाराष्ट्रातील बळीराजाचा… आपल्या सर्जा-राजाचा…!
- रामदास कदम यांना मोठा धक्का; कदम समर्थकांना शिवसेनेने पदावरून हटवलं
- ठरलं! रुपाली पाटील हातावर घड्याळ बांधणार, अजितदादांच्या उपस्थितीत मुंबईत होणार पक्षप्रवेश
- चंद्रकांत पाटलांच्या वैधानिक अभ्यासाबद्दल न बोललेलंच बरं – भास्कर जाधव
- बैलगाडा शर्यतीचा लढा: सुप्रिम कोर्टाच्या सुनावणीत उद्या अंतिम निर्णय, आमदार महेश लांडगे यांची माहिती