पुणे : कसबा पेठ आणि चिंचवड मतदार संघाची पोटनिवडणुक जाहीर झाली आहे. भाजप आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्त टिळक यांचं निधन झाल्याने ह्या दोन्ही मतदार संघातील जागा रिक्त झाल्या. यानिवडणुकीत भाजपकडून कुणाला उमेदवारी देण्यात यावी, यासाठी आज पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली आहे.
पंकजा मुंडेंना भाजच्याच नेत्यांकडून बदनाम करण्याचा कट, बावनकुळेंचं मोठं वक्तव्य
चंद्रकांत पाटील म्हणाले की, चिंचवड आणि कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. या दोन्ही पोटनिवडणुकीसाठी आम्ही तीन समित्या स्थापन केल्या आहेत. यामध्ये राजकीय समितीचं नेतृत्व आमदार माधुरी मिसाळ करतील तर यामध्ये संजय काकडे, धीरज घाटे, हेमंत रासने हे या समितीत असणार आहे. तसेच दुसरी समितीही ही संघटनात्मक समिती असणार आहे. यात राजेश पांडे यांच्यासह अनेक भाजपचे पदाधिकारी पक्षाचं संघटनात्मक काम पाहणार आहे.
गजानन काळेंचं आजपासून नाव गांजा काळे…! अभिजित बिचूकले अन् गजानन काळेंची जुंपली
भाजपचे पुणे शहाराध्यक्ष जगदीश मुळकी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणुक संचालन समिती स्थापन केली आहे. यामध्ये भाजपचे इतर पदाधिकारी काम करतील. तसेच या दोन्ही पोटनिवडणुकीचा निर्णय निवडणुक कोअर कमिठी घेणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर उमेदवारांबाबत या बैठकीत अद्यापही कोणतीही चर्चा झाली नाही. असंही त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, ह्या दोन्ही पोटनिवडणुका बिनविरोध होण्यासाठी आम्ही प्रयत्न केले आहेत. परंतु या निवडणुकांसाठी महाविकास आघाडीने तयारी सुरू केली आहे. काही नेत्यांनी तर पोस्टर लावण्यास सुरूवातही केली आहे. तसेच पिंपरी चिंचवडसाठी बैठक आम्ही लवकरच घेणार आहोत. त्यासाठी आज चिंचवड शहाराध्यक्ष आणि आमदार महेश लांडगे आज भेट घेण्यासाठी येणार आहेत. त्यानंतर मग त्याविषयी निर्णय घेणार. असंही त्यांनी म्हटलंय.
Read also
- “पंतप्रधान पदासाठी संजय राऊत अन् राहुल गांधी यांनी 2047 ची वाट पहावी”
- कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी भाजप अॅक्शन मोडवर..! आज भाजपकडून उमेदवार घोषीत होण्याची शक्यता
- “सुषमा अंधारे ही काळी मांजर…!” गजानन काळेंची सुषमा अंधारेंवर जहरी टिका
- “महाराष्ट्राच्या राजकारणातील नवे पर्व…! शिवशक्ती अन् भीमशक्ती युतीची घोषणा होणार?”
- चिंचवड पोटनिवडणुकीत आम आदमी पार्टीची उडी..! भाजप, राष्ट्रवादीला डोकेदुखी ठरणार ?