मुंबई : राज्यात सध्या अनेक राजकीय घडामोडी घडतांना दिसत आहेत. यातच काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी जाऊन त्यांनी ही विशेष भेट घेतली आहे. विशेष म्हणजे यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर देखील उपस्थिती होते. त्यामुळे शिवसेना आणि धनुष्यबाण यासंदर्भातील याचिकांवर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
राष्ट्रवादी, काॅंग्रेस, ठाकरे गट, अन् वचिंतचे कार्यकर्ते फोडले, शिंदेंच्या उपस्थितीत महाप्रवेश
काल शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह कुणाला मिळणार यावर सुनावणी झाली. परंतु पुढची तारीख मिळाल्याने तुर्तास राजकीय वातावरण थंडावले आहे. दोन्ही नेत्यांच्या भेटी मागचे कारण अस्पष्ट असून पाऊण तास दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर उपस्थित होते. पंतप्रधानांचा दौरा झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौरा करणार होते. मात्र काही कारणास्तव हा दौरा रद्द झाला आहे. अशातच उपमुख्यमंत्र्यांनी रात्री मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
राष्ट्रवादी, काॅंग्रेस, ठाकरे गट, अन् वचिंतचे कार्यकर्ते फोडले, शिंदेंच्या उपस्थितीत महाप्रवेश
शिवसेना आणि धनुष्यबाण यावर अलिकडचे निवडणुक आयोगासमोर सुनावणी पार पडली आहे. यावेळी दोन्ही गटाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला आहे. तर यावर लेखी उत्तर देण्यासाठी निवडणुक आयोगाने 30 जानेवारी पर्यंत वेळ दिला असून त्याच दिवशी यावर निवडणुक आयोग निकाल देण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेऊन पुढील रणनीती ठरविली असल्याची माहिती समोर येत आहे.
Read also
- बीड, नाशिक, अमरावती येथील कार्यकर्त्यांची मातोश्रीबाहेर रांग, उद्धव ठाकरेंची ताकद वाढतेय
- “भविष्यात साखर कारखान्यांना आर्थिकदृष्टया सक्षम होण्याची गरज”; शरद पवार
- “पिंपरी चिंचवडची पोटनिवडणुक राष्ट्रवादी लढवणार”, अजित पवारांनी दिले संकेत
- बल इंजिनंच सरकार विरोधकांना धडकी भरवणार..!
- अमृता फडणवीसांच्या ‘त्या’ कृतीवर राष्ट्रवादीचा आक्षेप..! थेट फडणवीसांच्या बंगल्यात…