बीड : शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी पंकजा मुंडे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंकजा मुंडे यांना अगोदर बोलू न दिल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. याच पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपलं स्पष्टिकरण दिलं आहे.
बल इंजिनंच सरकार विरोधकांना धडकी भरवणार..!
भाजपामध्येच पंकजा मुंडे आणि पक्षाला बदनाम करणारा एक गट आहे. तेच ही बदनामी करत आहेत. कालच्या माझ्या संपुर्ण प्रवासात पंकजा मुंडे माझ्यानंतरच बोलल्या. मी पंकजा मुंडेंना प्रथम स्थान दिलं. ती माझी जबाबदारी आहे, मी काही उपकार केलेले नाहीत. पंकजा मुंडे आमच्या नेत्या आहेत. त्या आमच्या राष्ट्रीय सचिव आहेत.त्यामुळे त्यांना नंतर बोला, मी आधी बोलतो हा त्यामागील आशाय होता. असंही त्यांनी म्हटलं आहे.
अमृता फडणवीसांच्या ‘त्या’ कृतीवर राष्ट्रवादीचा आक्षेप..! थेट फडणवीसांच्या बंगल्यात…
मागील काही दिवसांपासून पंकजा मुंडे ह्या भाजपवर नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंकजा मुंडे यांना ढावलण्याचा प्रयत्न करीत असल्याची चर्चा रंगली असतांना चंद्रशेखर बावनकुळे यांनी धक्कादायक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे एकच चर्चा सध्या सुरू आहे.
Read also
- गजानन काळेंचं आजपासून नाव गांजा काळे…! अभिजित बिचूकले अन् गजानन काळेंची जुंपली
- शिंदे सरकारला सरकारला कोसळण्याची भीती..! रात्री उशिरा शिंदे-फडणवीस अन् राहुल नार्वेकर यांच्यात वर्षावर बैठक
- बीड, नाशिक, अमरावती येथील कार्यकर्त्यांची मातोश्रीबाहेर रांग, उद्धव ठाकरेंची ताकद वाढतेय
- “भविष्यात साखर कारखान्यांना आर्थिकदृष्टया सक्षम होण्याची गरज”; शरद पवार
- “पिंपरी चिंचवडची पोटनिवडणुक राष्ट्रवादी लढवणार”, अजित पवारांनी दिले संकेत