मुंबई : राज्यात आजपासून राजकारणाचा एक नवा अध्याय सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जंयती देखील साजरी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडणार आहे. या पत्रकार परिषदेत आज शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येण्याची शक्यता राजकारणाच्या वर्तुळात वर्तवली जात आहे.
“भविष्यात साखर कारखान्यांना आर्थिकदृष्टया सक्षम होण्याची गरज”; शरद पवार
आज शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांची दादर येथील आंबेडकर भवन याठिकाणी पत्रकार परिषद होत आहे. दुपारी 1 वाजता ही पत्रकार परिषद होत असून यावेळी शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. तसेच शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या युतीची घोषणा होणार असल्याचं संकेत या पत्रकार परिषदेतून देण्यात आले आहेत.
“पिंपरी चिंचवडची पोटनिवडणुक राष्ट्रवादी लढवणार”, अजित पवारांनी दिले संकेत
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, शिवशक्ती आणि भीमशक्तीचा एल्गार..! संयुक्त पत्रकार परिषद 23 जानेवारी दुपारी 12.30 आंबेडकर भवन नायगाव.. महाराष्ट्राच्या राजकारणातील नवे पर्व असंही त्यांनी म्हटलं आहे. या पत्रकार परिषदेसाठी उद्धव ठाकरे पहिल्यांदाच आंबेडकर भवन येथे येणार आहेत. एरव्ही शिवसेनेच्या कोणत्याही मोठ्या निर्णयाची घोषणा मातोश्री किंवा शिवसेना भवनातून केल्या जातात. परंतु यावेळी पहिल्यांदाच शिवशक्ती आणि भीमशक्ती युतीची घोषणा आंबेडकर भवनातून केली जाणार आहे.
बल इंजिनंच सरकार विरोधकांना धडकी भरवणार..!
दरम्यान, वंचित बहुजन आघाडी यांची शिवसेनेसोबत युती झाल्यास महाविकास आघाडीमध्ये चौथा पक्ष येणार आहे. राष्ट्रवादी, शिवसेना, काॅंग्रेस आणि वंंचित बहुजन आघाडी यांची आता महाविकास आघाडी होण्याची शक्यता आहे. परंतु असे झाल्यास ही आघाडी टिकवून ठेवण्यासाठी मोठे कष्ट घेण्याची गरज चारही पक्षांना घेण्याची गरज पडेल अशाही चर्चा रंगल्या आहेत.
Read also
- चिंचवड पोटनिवडणुकीत आम आदमी पार्टीची उडी..! भाजप, राष्ट्रवादीला डोकेदुखी ठरणार ?
- पंकजा मुंडेंना भाजच्याच नेत्यांकडून बदनाम करण्याचा कट, बावनकुळेंचं मोठं वक्तव्य
- गजानन काळेंचं आजपासून नाव गांजा काळे…! अभिजित बिचूकले अन् गजानन काळेंची जुंपली
- शिंदे सरकारला सरकारला कोसळण्याची भीती..! रात्री उशिरा शिंदे-फडणवीस अन् राहुल नार्वेकर यांच्यात वर्षावर बैठक
- बीड, नाशिक, अमरावती येथील कार्यकर्त्यांची मातोश्रीबाहेर रांग, उद्धव ठाकरेंची ताकद वाढतेय