पुणे : लोकशाही किती सुदृढ असते ती कोणालाही पळवून लावू शकतो हे माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्याकडे पाहिल्यावर कळते. मी कोणाचे नाव घेत नाही फक्त टोपी फेकतो ती कोणाला लागेल माहीत नाही. असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच नावं न घेता टोला लगावला आहे. ते पुण्यात भाजप : काल आज आणि उद्या या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलत होते. २०१९ साली शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्याची तयारी केली होती मात्र नंतर त्यांनी माघार घेतली होती. याचाच धागा पकडत चंद्रकांत पाटलांनी पवारांना टोला लगावला आहे.
सरकारचे बारा वाजण्यास फक्त 12 दिवस बाकी..; मनसेच्या ‘त्या’ सभेची जोरदार चर्चा
भाजप : काल आज आणि उद्या या पुस्तकाचे प्रकाशन विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पुण्यात करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार राम सातपुते, आमदार सिद्धार्थ शिरोळे, भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक हे उपस्थित होते. हे पुस्तक शांतनू गुप्ता यांनी लिहलं असून याचा मराठी अनुवाद मल्हार पांडे यांनी केला आहे.
“आली रे आली.. पोलखोलीला घाबरून, मोहीम उधळून लावण्याची वेळ आली”
दरम्यान, यावेळी चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना देखील जोरदार टोला लगावला आहे. रोज सकाळी उठून बोलतात मीडिया यांना कव्हरेज देते म्हणून यांना वाटत आम्ही जे बोलतो तेच खर पण असं नसत. ते खरे लवंगी आहेत. असा टोला चंद्रकांत पाटलांनी लगावला आहे. सर्वे भवन्तु सुखिन: हे भगव्याचे विचार नव्या पीढित रुजवण्यासाठी हा ग्रंथ नक्की उपयोगी ठरेल, अशी अशा व्यक्त केली.
मनसेने जाहीर केल्या 3 ठिकाण, 3 तारखा! मनसेची आगामी राजकीय रणनीती ठरतेय
तर या सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर चांगलंच तोंडसुख घेतले आहे. असे अनेक पक्ष असतील ज्यांनी हिंदुत्वाची शाल पांघरली आहे आम्हला शाल पांघरायची गरज नाही हिंदुत्व आमच्या रक्तात आहे आमचा जन्मच हिंदुत्वातून झाला आहे. अस म्हणत फडणवीसांनी शिवसेनेला फटकारले आहे.
Read also:
- “जिथं तुमच्या नेत्याला सुरक्षा पुरवू शकत नाही, तिथं सामान्य माणसाची काय कशा ?”
- “तेरी भी चुप, मेरी भी चुप म्हणत सत्ताधारी-विरोधी गप्प”; त्यासाठी हुंकार यात्रा
- “ते भोंग्या बिग्यांचं बाजूला ठेवा, आधी महागाईचं बोला; राजू शेट्टींचा राज ठाकरेंना टोला
- “मोदींच्या ‘अच्छे दिना’चे पाढे काँग्रेस पक्ष ठिकठिकाणी भोंग्यांवर वाचणार”
- राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं ‘ते’ पत्र बनावट! नियुक्तीसाठी पाठवलेली ‘ती’ सहा नावं कोणती?