मुंबई : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात एका तरुणीने पोलिसात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. 2006 पासून आपल्यावर अत्याचार सुरु असल्याचा दावा तिने केला आहे. बॉलिवूडमध्ये संधी मिळवून देण्याच्या नावाखाली इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप तिने तक्रारीत केला आहे. मुंडेवरील आरोपांनंतर आता राज्यातील राजकारण तापले असून, विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी केली जात आहे.
भाजप महिला मोर्चाच्या वतीने धनंजय मुंडेंचा त्वरित राजीनामा घ्यावा, अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा यांनी केलेल्या आरोपींची चौकशी होईलच. पण मुंडे यांनी स्वत: कबुली दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा. त्यांचा राजीनामा नाही घेतला तर आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा चंद्रकांत पाटलांनी दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांकडे त्यांनी मुंडेंचा राजीनामा घेण्याची मागणी केली आहे. पाटील म्हणाले की, शरद पवारांचे राजकारण शुद्ध, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाही. पवारांचं राजकारण नेहमी नैतिकतेचं राहिले आहे. त्यामुळे ते धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतील असा विश्वास आहे.
Read Also :
- शेतकरी विरोधी कायदे रद्द होईपर्यंत संघर्ष सुरुच राहणार, राहुल गांधींचा इशारा
- ‘टेस्ला कंपनी पळाली कर्नाटकला, पेज 3 मंत्र्यांना झटका’, संदीप देशपाडेंचा आदित्य ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
- न्यायालयाची शेतकरी कायद्यांना स्थगिती, मात्र लढाई अजून संपलेली नाही – सतेज पाटील
- ‘धनंजय मुंडेंचा त्वरित राजीनामा घ्या, अन्यथा…’, भाजप आक्रमक
- मृत्यूपर्यंत लढा देणार, ढोंगीला शिक्षा मिळणारच; मुंडेंवर आरोप करणाऱ्या महिलेचे ट्विट