मुंबई : इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील दिग्गज कंपनी टेस्लाची अखेर भारतात एंट्री झाली आहे. मागील अनेक दिवसांपासून टेस्ला भारतात येण्यासाठी परवानगीच्या प्रतिक्षेत होती. आता अखेर टेस्लाची भारतात एंट्री झाली आहे.
कंपनीने ‘टेस्ला मोटर्स इंडिया अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड’ नावाने भारतात रजिस्ट्रेशन केलं आहे. कंपनी बंगळुरूमधून आपल्या व्यवसायास सुरुवात करणार आहे. विशेष म्हणजे टेस्लाने महाराष्ट्रातून सुरुवात करावी यासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून प्रयत्न करण्यात आले होते.
टेस्ला कंपनी पळाली कर्नाटकला पेज 3 मंत्र्यांना झटका" बोलाची कढी बोलाचा भात" pic.twitter.com/tvtD9CJLXT
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) January 13, 2021
आता टेस्लाने महाराष्ट्राऐवजी कर्नाटकची निवड केल्याने मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. पेज 3 मंत्री म्हणून देशपांडे यांनी आदित्य ठाकरेंचा अप्रत्यक्ष उल्लेख केला आहे.
टेस्लाची सुरुवात महाराष्ट्रात व्हावी यासाठी आदित्य ठाकरेंकडून प्रयत्न करण्यात आले होते. यासंदर्भात टेस्लाच्या टीमसोबत बैठक देखील झाली होती. दरम्यान, भारतातील आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेंगळुरूमधून टेस्ला आपल्या व्यवसायाला सुरूवात करणार असून इथेच कंपनीने रजिस्ट्रेशन केले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी टेस्लाचे कर्नाटकात स्वागत केले आहे.
Read Also :
- न्यायालयाची शेतकरी कायद्यांना स्थगिती, मात्र लढाई अजून संपलेली नाही – सतेज पाटील
- ‘धनंजय मुंडेंचा त्वरित राजीनामा घ्या, अन्यथा…’, भाजप आक्रमक
- मृत्यूपर्यंत लढा देणार, ढोंगीला शिक्षा मिळणारच; मुंडेंवर आरोप करणाऱ्या महिलेचे ट्विट
- … तरीही पुणे महापालिका आम्हीच जिंकणार, चंद्रकांत पाटलांचा निर्धार
- राजकारणातील घराणेशाही लोकशाहीचा सर्वात मोठा शत्रू, मोदींची काँग्रेसवर अप्रत्यक्ष टीका