पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात बंड पुकारून भाजपसोबत सत्ता स्थापन केली. पक्ष फुटीनंतरही अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीगाठी होत आहेत. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. तर राज्यातील विरोधी पक्ष नेतेही याबाबत संभ्रम अवस्थेत गेलेले दिसून येत आहेत. यातच आता पक्षात कोणतीही फुट झाली नसल्याचं विधान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.
हेही वाचा…“शरद पवारांनी मैदान मारलं, पण अजित पवार गटाकडून जोरदार प्रत्यु्त्तर”, वाचा सविस्तर
आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन सुप्रिया सुळे यांनी याबाबत भाष्य केलं. सध्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून शरद पवार असून महाराष्टाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटील आहेत. एका गटाने फक्त वेगळी भूमिका घेतली आहे. परंतु राष्ट्रवादीमध्ये कोणतीही फुट पडलेली नाहीय. असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. तसेच भाजपने आतापर्यंत तीन ते चार वेळा राष्ट्रवादी फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु आता त्यांना राष्ट्रवादी फोडण्यात यश आलं आहे. असंही त्या म्हणाल्या.
हेही वाचा…“नार्वेकर चुकीचा निर्णय देऊ शकत नाहीत” , शिवसेनेचे १६ आमदार पात्र की अपात्र होणार ?
सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टिकेला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आम्ही कोणाचीही पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला नाही, आमचा तो स्वभाव नाही, संस्कार नाही, ज्यांचे संस्कार आहे ते देशाला माहिती आहे. महाराष्ट्राला माहिती आहे. त्यांचे संस्कार त्यांना लखलाभ. ज्यांनी जीवनभर पक्ष फरोडण्याचे राजकारण केले. ते आमच्यावर बोलत आहेत. असं बावनकुळेंनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…डिनरमध्ये झुणका भाकर, वडापाव, अन् तुतारी, नाशिक ढोलच्या गजरात इंडियाच्या नेत्यांचं मुंबईत जंगी स्वागत होणार
हेही वाचा…“ट्रीपल इंजिन सरकारमधील श्रेयवादाच्या लढाईत शेतकऱ्यांचं मरण होतंय,” वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल
हेही वाचा…“रोहित पवारांना अजित पवारांची जागा घ्यायचीय”, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा मोठा दावा
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांचं नाफेडच्या अधिकाऱ्यांना पत्र, कांदा प्रश्नी केली ‘ही’ मागणी
हेही वाचा…“भारतीय कुस्ती खेळाडू वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धेत तिरंग्याखाली खेळू शकणार नाहीत,” UWW ची मोठी कारवाई, अमोल कोल्हे संतापले