सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सूकता लागली होती. आज अखेर अपेक्षेप्रमाणे भाजपचे मनीष दळवी यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली आहे. तर उपाध्यक्षपदी अतुल काळसेकर हे विजयी झाले आहेत. विषेशत म्हणजे राणेंच्या उमेदवारांनी बाजी मारली आहे.
भाजपला धक्यावर धक्के; तब्बल सात आमदारांचे राजीनामे, मोदी लाट ओसरली?
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने विजय प्राप्त केला आहे. या निवडणुकीत 19 पैकी 11 सदस्य हे भाजपचे निवडून आले आहेत. तर आठ संचालक पदांवर महाविकास आघाडीच्या संचालकांना विजय मिळवता आला होता. आज गुरुवारी या बँकेच्या अध्यक्ष उपाध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजपचे मनिष दळवी यांनी अध्यक्षपदासाठी तर अतुल काळसेकर यांनी उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केले होते. तर महाविकास आघाडीच्या वतीने अध्यक्षपदासाठी व्हिक्टर डांटस तर उपाध्यक्षपदासाठी सुशांत नाईक यांनी अर्ज दाखल केले होते. या निवडणुकीसाठी गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात आले. या निवडणुकीत भाजपचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी ११ विरुद्ध ७ अशा मतांनी विजय मिळवला. महाविकास आघाडीच्या सदस्या सौ. अनिता राणे या निवडणूक प्रक्रियेत अनुपस्थित राहिल्या होत्या.
मंत्री छगन भुजबळ पुन्हा अडचणीत? अंजली दमानियांचे न्यायालयात आवाहन… काय नेमकं प्रकरणं…
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी प्रत्यक्ष गुप्त पद्धतीने मतदान झाले. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांसाठी दोन्ही पक्षांकडून दाखल झालेले अर्ज वैध ठरल्याने प्रत्यक्ष गुप्त पद्धतीने मतदान झाले. जिल्हा बँक अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे प्रत्यक्ष उपस्थित राहिले. जिल्हा बँकेकडे येऊन ते पुन्हा जवळच असलेल्या जिल्हा परिषदेत ठाण मांडून होते.
Read also:
- भाजप नेते नितेश राणे यांना न्यायालयाचे अभय? आजच्या सुनावणीत नेमकं काय घडलं…
- मराठी पाट्यांचं श्रेय लाटण्याचा आचरटपणा करू नका; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा गर्भित इशारा
- बांगड्या विकू, मात्र आंदोलन सुरुच राहील; एसटी कर्मचाऱ्यांनी शोधला जगण्याचा नवा पर्याय
- मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या विरोधात शिवसेना उमेदवार देणार? संजय राऊतांची मोठी घोषणा
- कोरोनामुक्त होताच रोहित पवारांनी मतदारसंघ गाठला; कर्जत नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणनिती?