उस्मानाबाद : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्याच्या उद्देशाने परिवहन मंत्र्यांसह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कृती समितीची बैठक झाली. त्यानंतर कर्मचाऱ्यांना कामावर परत येण्याचं आवाहन करण्यात आलं. परंतू, आंदोलन मागे घेण्यासाठी राज्यसरकारचे सर्व प्रयत्न फसले आहेत. पगारवाढीच्या आमिषाला आणि निलंबन, बडतर्फ अशा कारवाईला न घाबरता आंदोलनाची धग अद्यापही कायम ठेवत या कर्मचाऱ्यांनी नोकरीव्यतिरिक्त पर्यायी मार्ग शोधायला सुरुवात केली आहे. त्यामुळे राज्य सरकार आता एसटीचे विलिनिकरण करणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
गोवा, यूपीत राष्ट्रवादीने एक एक आमदार धरून आणलेत; चंद्रकांत पाटलांचा खोचक टोला
आम्हाला विलनीकरण हवं आहे बाकी काहीही नको, अशी ठाम भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. कुटूंबाची रोजीरोटी चालू ठेवण्यासाठी बांगड्या विकून प्रपंच भागवू मात्र आंदोलन मागे घेणार नसल्याचा ठाम निर्धार एसटी कर्मचारी संतोष राऊत यांनी केला आहे. मकर संक्रांती निमित्त हंगामी व्यवसाय म्हणून राऊत यांनी काचेच्या बांगड्या विकण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी बंद असल्याने मागील दोन महिन्यापासून पगार नाही. कुटुंबात एकूण सात माणसं आहे. त्यात तीन मुलांचे शिक्षण त्यामुळे पर्यायी मार्ग म्हणून बांगडी विकण्याचा निर्णय घेतला. गेल्या 26 वर्षांपासून मी या एसटी महामंडळात वाहक पदावर आहे. मात्र, अद्याप मी स्वतः चे घरही घेऊ शकलो नाही. मग ही अशी नोकरी का करायची? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे
गेल्या दोन महिन्यापासून म्हणजेच नोव्हेंबर महिन्याच्या 7 तारखेपासून आंदोलन सुरु आहे. दरम्यान, जिल्ह्यातील 238 कर्मचाऱ्यांचे निलंबन केलं आहे. तर 51 बडतर्फ केले आहे. मात्र, अद्यापही दोन हजार कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. संतोष राऊत यांच्याप्रमाणे इतर आंदोलक कर्मचाऱ्यांनी उपजिविकेसाठी पर्यायी मार्ग शोधला आहे. बाजारात भाजी विक्रीपासून ते खाजगी वाहनावर रोजंदारी चालक म्हणून काम करायला सुरुवात केली आहे.
Read also:
- मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या विरोधात शिवसेना उमेदवार देणार? संजय राऊतांची मोठी घोषणा
- कोरोनामुक्त होताच रोहित पवारांनी मतदारसंघ गाठला; कर्जत नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणनिती?
- मंत्री छगन भुजबळ पुन्हा अडचणीत? अंजली दमानियांचे न्यायालयात आवाहन… काय नेमकं प्रकरणं…
- भाजपला धक्यावर धक्के; तब्बल सात आमदारांचे राजीनामे, मोदी लाट ओसरली?
- पंतप्रधानांनी बोलावलेल्या बैठकीला उद्धव ठाकरेंची दांडी; मुख्यमंत्र्यांच्या जागी कोणाची हजेरी?